पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचं वयाच्या १०० व्या वर्षी निधन झालं. आज पहाटे साडेतीनच्या सुमारास हिराबेन मोदींनी अहमदाबादमधील यू. एन. मेहता रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. पंतप्रधान मोदींनीच आपल्या आईच्या निधनासंदर्भातील माहिती ट्विटरवरुन दिली. आईचा एक फोटो शेअर करत मोदींनी ही माहिती दिली. हिराबेन मोदींच्या निधनाचं वृत्त समोर आल्यानंतर अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी दुःख व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे.

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, कंगना रणौत, अनुपम खेर, विवेक अग्निहोत्री, कपिल शर्मा, कुमार विश्वास यांनी ट्विटरवर पोस्ट शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईला श्रद्धांजली वाहिली आहे.

Video: मोदींना मातृशोक! हिराबेन यांच्या पार्थिवावर गांधीनगरमध्ये अंत्यसंस्कार; मोदींनी रुग्णवाहिकेतून केला प्रवास

अभिनेता अक्षय कुमारने ट्वीट केलंय, “आईला गमावण्याचं दुःख खूप मोठं आहे. हे दुःख सहन करण्याची तादक तुम्हाला मिळो. ओम शांती”

अभिनेते अनुपम खेर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचा फोटो शेअर करत ट्विटरवर लिहिलं, “सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, तुमच्या मातोश्री हिराबा यांच्या निधनाबद्दल ऐकल्यानंतर दुःख झालं. त्यांच्याप्रती तुमचं प्रेम आदर जगभरात सर्वांना माहीत आहे. त्यांची तुमच्या आयुष्यातील जागी कोणीच भरून काढू शकणार नाही. पण तुम्ही भारत मातेचे सुपुत्र आहात, देशातील प्रत्येक आईचा आशीर्वाद तुमच्या डोक्यावर आहे. माझ्या आईचाही.”

नक्की पाहा – पंतप्रधान मोदींचा रुग्णवाहिकेतून प्रवास, गांधीनगरमधील घराबाहेरची गर्दी अन्…; हिराबेन मोदींना अखेरचा निरोप देतानाची क्षणचित्रे

कॉमेडियन कपिल शर्माने पंतप्रधान नरेंद्र मोदींच ट्वीट रिट्वीट करताना लिहिलं, “सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आईने हे जग सोडून जाणं खूप वेदनादायी असतं. त्यांचे आशीर्वाद नेहमीच तुमच्या पाठीशी असतील. देव आईला आपल्या चरणाशी स्थान देवो हीच प्रार्थना ओम शांती.”

आणखी वाचा- ‘मी तुला जन्म दिला असला तरीही…’; हिराबेन मोदींनी पंतप्रधानांना दिली होती मोलाची शिकवण

‘दसवी’ चित्रपटाचे संवाद आणि स्क्रिप्ट लिहिणारे लेखक आणि कवी कुमार विश्वास यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईला श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी लिहिलं, “सन्माननीय पंतप्रधानजी, आई- वडील आणि गुरू कधीच दिवंगत होत नाहीत. त्यांचे संस्कार आणि शिकवण यांच्या माध्यमातून ते आपली मुलं आणि शिष्यांमध्ये कायमच राहतात. तुमची आईही तुमची सत्कार्य आणि सात्विक संकल्प यामध्ये कायम जिवंत राहिल. ओम शांती.”

आणखी वाचा – नरेंद्र मोदींसारख्या व्यक्तीला जन्म देणं हे हिराबेन यांचं मोठं योगदान; संजय राऊतांची श्रद्धांजली

याशिवाय अभिनेत्री कंगना रणौतनेही इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत श्रद्धांजली वाहिली आहे. तिने लिहिलं, “पंतप्रधानांच्या आयुष्यातील या कठीण काळात देव त्यांना धैर्य आणि शांती देवो. ओम शांती.”

kangana ranut insta

या व्यतिरिक्त ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी श्रद्धांजली वाहणारं ट्वीट केलं आहे. तसेच स्मृती ईराणी यांनीही इन्स्टाग्रामवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचा एक अनसीन व्हिडीओ शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Smriti Irani (@smritiiraniofficial)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हिराबेन मोदी यांचा जन्म १८ जून १९२३ रोजी झाला. याच वर्षी त्यांनी वयाची शंभरी ओलांडली होती. याच माहिन्याच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या आईची भेट घेतली होती. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील प्रचारानिमित्त मोदी गुजरातमध्ये होते तेव्हा त्यांनी आईची भेट घेतली होती.