बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अटक झाली आहे. तो सध्या मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये कैद आहे. २ ऑक्टोबर रोजी कॉर्डेलिया क्रूझ ड्रग पार्टीच्या छाप्यात आर्यन खानला ताब्यात घेण्यात आले. तर अद्याप आर्यनला जामीन मंजूर न झाल्याने २० ऑक्टोबरला होणाऱ्या पुढील सुनावणीपर्यंत त्याला तुरुंगातच राहवे लागणार आहे. दरम्यान, या प्रकरणावर अनेक बॉलिवूड कलाकार प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. आता अभिनेत्री पूजा बेदीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे.

पूजाने ट्विटरवर पोस्ट शेअर करत आर्यनच्या अटकेवर प्रतिक्रिया दिली आहे. “जर आर्यनजवळ कोणतेही ड्रग्स सापडले नाहीत, तर एका निर्दोष मुलाला विनाकारण तुरुंगात दिवस घालवावे लागत आहेत, हे भयावह नाही का? विनाकारण तुरुंगात टाकणे म्हणजे मानसिक हानी पोहोचवणारे आहे. न्यायव्यवस्थेमध्ये मोठ्या सुधारणेची गरज आहे…अशा यंत्रणा या निर्दोषी लोकांना शिक्षा देत गुन्हेगार निर्माण करण्याचे काम करत आहेत,” अशा आशयाचे ट्वीट पूजा बेदीने केले आहे.

आणखी वाचा : घटस्फोटानंतर समांथाने केली मोठी घोषणा!

आणखी वाचा : सैफसोबत लग्न करण्यासाठी करीनाने आई-वडिलांना दिली होती ‘ही’ धमकी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, गेल्या ८ ऑक्टोबरपासून आर्यन हा आर्थर रोड जेलमध्ये आहे. आर्यनला कोणतीही खास सुविधा देण्यात आलेली नाही, ज्यामुळे तो इतर कैद्यांपासून वेगळे करेल. ज्याप्रमाणे प्रत्येक कैद्याला एक नंबर दिला जातो त्यांच प्रमाणे आर्यनला ९५६ हा कैदी नंबर देण्यात आलाय.