बॉलिवूडची बेबो करीना कपूर खान आणि पती सैफ अली खान यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. त्यांच्या लग्नाला आज ९ वर्ष पूर्ण झाली आहेत. करीना आणि सैफचं लग्न १६ ऑक्टोबर २०१२ रोजी झालं होतं. वयाने १० वर्ष मोठ्या असणाऱ्या सैफशी लग्न करण्यासाठी काहीही करायला करीना तयार होती. एवढंच नाही तर त्यांनी घरातून पळून जाण्याचा प्लॅन देखील केला होता. याविषयी करीनाने स्वत: एका मुलाखतीत सांगितले होते.

करीना म्हणाली होती की “त्यांच्या प्रायव्हसीला घेऊन तिला खूप काळजी वाटतं होती. आम्ही आमच्या कुटुंबाला धमकीही दिली होती, जर आमचे लग्न मीडिया सर्कस झाले तर आम्ही घर सोडून पळून जाऊ. आमच्या लग्नातल्या छोट्या छोट्या गोष्टींबद्दल लोकांना जाणून घ्यायचे होते. पण आम्हाला ते नको होते. आम्ही कोर्ट मॅरेज केलं आणि वरती छतावर जाऊन सगळ्यांना हॅलो बोललो.”

आणखी वाचा : घटस्फोटानंतर समांथाने केली मोठी घोषणा!

एका दुसऱ्या मुलाखतीत सैफला जीवनसाथी का निवडले याविषयी करीना म्हणाली, “मी सैफला माझा जीवनसाठी म्हणून निवडल्याचे कारण मला एक आत्मनिर्भर स्त्री म्हणून जगायचे होते. मला लग्नानंतरही काम करायचे होते आणि सैफने माझी ही अट मान्य केली होती.”

आणखी वाचा : Bigg Boss 15 : “नाही मी पण म्हातारा आहे…”, अफसानावर संतापला सलमान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लग्ना आधी करीना आणि सैफ ५ वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. लग्ना आधी करीना शाहिद कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती. मात्र, काही कारणांमुळे त्यांचा ब्रेकअप झाला. त्यानंतर टशन चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान, करीना आणि सैफ रिलेशनशिपमध्ये आले.