‘आदिपुरुष’ साठी प्रभासने घेतले इतके कोटी? मानधनाचा आकडा ऐकून तुम्हीही व्हालं थक्क!

विशेष म्हणजे हे मानधन ऐकून अनेकजण थक्क झाले आहे.

हल्ली सिनेसृष्टीत काही असे कलाकार आहे, ज्यांच्यावर निर्मात्यांचा फार जास्त विश्वास आहे. हे अभिनेते-अभिनेत्री इतके प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहेत की त्यांच्या उपस्थितीमुळे चित्रपट हिट होणार याची निर्मात्यांना खात्री असते. पण यासाठी हे कलाकार भरघोस फी देखील आकारतात. या यादीत बाहुबली चित्रपटामुळे लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेला अभिनेता म्हणजे प्रभास याचाही समावेश होतो. प्रभासने त्याच्या आगामी आदिपुरुष या चित्रपटासाठी सर्वाधिक मानधन मागितल्याचे बोललं जात आहे. विशेष म्हणजे हे मानधन ऐकून अनेकजण थक्क झाले आहे.

प्रभासचे जगभरात लाखो चाहते आहेत. तो सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीमधील एक म्हणून ओळखला जातो. बॉलिवूड हंगामा या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, प्रभास सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. प्रभासने त्याच्या आगामी ‘आदिपुरुष’ आणि ‘आत्मा’ या चित्रपटांसाठी तब्बल १५० कोटी रुपये फी घेतल्याचे बोललं जात आहे.

यामुळे सलमान खान आणि अक्षय कुमार यांच्यानंतर गेल्या १० वर्षांत एवढी मोठी रक्कम घेणारा प्रभास हा तिसरा अभिनेता ठरला आहे. सलमान खानने ‘सुलतान’ आणि ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटासाठी १०० कोटींपेक्षा अधिक फी घेतली होती. तर अक्षय कुमारने ‘बेल बॉटम’साठी १०० कोटी रुपये मानधन घेतले होते. यानंतर आता प्रभासने आगामी ‘आदिपुरुष’ आणि ‘आत्मा’ या चित्रपटांसाठी तब्बल १५० कोटी रुपये फी घेतल्याची माहिती समोर येत आहे.

‘आदिपुरूष’ हा रामायणावर आधारित एक पीरियड ड्रामा सिनेमा आहे. ‘आदिपुरुष’ बिग बजेट चित्रपट असून तो ११ ऑगस्ट २०२२ रोजी प्रदर्शित केला जाणार आहे. या सिनेमात प्रभाससोबत अभिनेत्री कृति सेनन झळकरणार आहे. या सिनेमात प्रभास रामाची भूमिका साकारणार आहे.तर कृति सीतेच्या भूमिकेत झळकणार आहे. रावणाची भूमिका अभिनेता सैफ अली खान साकारणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन ओम राउत करत आहेत.

चित्रपटासाठी 350 कोटी खर्च

‘आदिपुरुष’ सिनेमाचं शूटिंग सुरू करण्यात आलं होतं. मात्र करोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे शूटिंग पुन्हा ठप्प पडलं. मीडिया रिपोर्टनुसार या सिनेमासाठी जवळपास ३५० ते ४०० कोटी खर्च करण्यात येणार आहेत. हा सिनेमा हिंदी, तमिळ,तेलगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये रिलीज होणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Prabhas charged 150 crore for adipurush movie says a report nrp

ताज्या बातम्या