‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळीला ओळखले जाते. ती लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. गेले काही दिवस ती ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या शूटिंगमधून थोडी विश्रांती घेऊन लंडनला गेली आहे. तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी ती लंडनला गेली होती. प्राजक्ता आणि पर्यटन यांचे जिवाभावाचे नाते आहे. तिला फिरण्याची खूप आवड आहे. नुकतीच ‘जागतिक पर्यटन दिनानिमित्त’ तिने एक पोस्ट केली आहे. त्या पोस्टमधून तिचे महाराष्ट्रावर किती प्रेम आहे हे दिसून येत आहे.

आणखी वाचा : प्रियांका पाठोपाठ कतरिना कैफही आत्मचरित्र लिहिण्याच्या तयारीत, ‘या’ व्यक्तींबद्दल करणार मोठे खुलासे

प्राजक्ताने भारताबरोबरच अनेक विदेश दौराही केले आहेत. ती आतापर्यंत जवळपास १४ देशांमध्ये फिरली आहे. याविषयी तिने अनेकदा लिहिले आहे. पण काल झालेल्या ‘जागतिक पर्यटन दिनानिमित्त’ तिने एक खास पोस्ट केली आहे. एक व्हिडीओ पोस्ट करत परदेशातील नव्हे तर महाराष्ट्रातील तिने भेटी दिलेल्या ठिकाणांचे फोटो शेअर केले आहेत. महाराष्ट्रात किती छान छान पर्यटन ठिकाणं आहेत हे सांगत महाराष्ट्राबद्दलचा अभिमान तिने व्यक्त केला आहे. यामध्ये धारावी, मुंबई, पुणे, रत्नागिरी, कोल्हापूर अशा काही ठिकाणांचा समावेश आहे.

व्हिडीओ शेअर करत प्राजक्ताने कॅप्शनमध्ये लिहिले, “देशभरातल्या विविध ठिकाणांचा व्हिडिओ पोस्ट केल्यावर लक्षात आलं, महाराष्ट्रातल्या ठिकाणांचाही व्हिडिओ करायला हवा… त्याचा प्रवास तर फारच ह्रदया जवळचा आहे… मी केवळ मराठी आहे म्हणून नाही तर “महाराष्ट्र” आहेच लय भारी…”

पुढे ती महणाली, “माझं भाग्य की ‘मस्त महाराष्ट्र’ कार्यक्रम, इतर अनेक शुटींग्स आणि इव्हेंट्सच्या निमित्ताने मला जवळपास सबंध महाराष्ट्र बघता, फिरता आला… (ह्या कार्यक्रमाचे एपिसोड्स झी5 वर आहेत… ) जग फिरलो पण स्वतःचा भूभाग, संस्कृती माहिती नाही, अस झाल नाही.(अजूनही बरच बाकी आहे; आणि कितीही फिरल तरी हे वाटत राहणारच आहे, ते तसं वाटत रहायलाही हवय…)” प्राजक्ताची ही पोस्ट खूप चर्चेत आहे.

हेही वाचा : Photos : “गैरसमज नसावा प्रिय भारताला उद्देशून…” लंडनला गेलेल्या प्राजक्ता माळीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान प्राजक्ता माळी ही गेल्या काही दिवसांपासून रानबाजार या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. इतकंच नव्हे तर ती कंट्रोल एन प्रॉडक्शन निर्मित वाय चित्रपटात झळकली होती. त्यानंतर आता ती आणखी एका चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याचे नाव, स्टार कास्ट याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.