बॉबी देओलच्या ‘या’ सवयीला कंटाळली होती प्रिती

प्रितीने एकदा प्रसारमाध्यमांशी बोलताना बॉबीबद्दल अनेक खुलासे केले होते.

बॉलिवूडची ‘डिंपल गर्ल’ म्हणजेच प्रिती झिंटा हिने आपल्या दमदार अभिनयाने आणि परफॉर्मन्सने बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. सध्या प्रिती सिनेसृष्टीपासून दूर असली तरीही तिच्या चाहत्यांचा आकडा मात्र काही कमी झालेला नाही. ‘सोल्जर’ हा चित्रपट तिच्या सिनेसृष्टीच्या करिअरमधील सर्वाधिक चर्चेत असलेला चित्रपट ठरला. या चित्रपटात तिने अभिनेता बॉबी देओलसोबत काम केले होते. या दोघांची जोडी पडद्यावर हिट ठरली असली तरी प्रितीला काही कारणामुळे नेहमी बॉबीचा राग यायचा. यावरुन बॉबीने तिची बोलणीही ऐकली आहेत.

‘सोल्जर’ या चित्रपटामुळे बॉबी देओल आणि प्रितीची छान मैत्री झाली होती. प्रेक्षकांनीही या जोडीवर प्रचंड प्रेम केले. प्रितीने एकदा प्रसारमाध्यमांशी बोलताना बॉबीबद्दल अनेक खुलासे केले होते. यावेळी ती म्हणाली, “बॉबी नेहमी माझ्यासोबत मुलांसारखा वागतो. त्याला नेहमी असे वाटते की मुलगी नाही मुलगाच आहे. आमचे नाते पूर्णपणे वेगळे आहे. आम्ही एकमेकांचे खूप चांगले मित्र आहोत.”

“मात्र बॉबी देओलची एक सवय मला अजिबात आवडत नाही. त्याच्या या सवयीबद्दल मी त्याला अनेकदा अडवते. तो फार पूर्वी खूप मोठ्या मोठ्याने ओरडून बोलायचा. मी त्याला याबद्दल अडवायचे. बॉबी तू हे काय करतोस? मी खरचं त्याच्या या सवयीला कंटाळली होती,” असे प्रिती त्यावेळी म्हणाली होती.

त्यानंतर प्रिती म्हणाली, “बॉबी हा खूप चांगला व्यक्ती आहे. मला त्याच्यासोबत कधीही अस्वस्थ वाटले नाही. मी बॉबीसोबत असताना मला बरेच लोक विचारतात की मी फार अस्वस्थ असते किंवा मला असुरक्षित वाटते. पण तसे अजिबात नाही,” असेही तिने सांगितले.

दरम्यान प्रितीने बॉबीसोबत अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. तिच्या गालावरच्या खळीचे तर लाखो दिवाने आहेत. ‘वीर झारा’, ‘सलाम नमस्ते’, ‘कल हो ना हो’ या सारख्या अनेक चित्रपटाच्या माध्यमातून ती रुपेरी पडद्यावर झळकली होती. बॉलिवूडमध्ये एन्ट्री केल्यापासून कोणत्याची गॉड फादरशिवाय प्रितीने बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Preity zinta got irritated due to bobby deol habit during media interview nrp