मल्याळम अभिनेते पृथ्वीराज सुकुमारन आणि इंद्रजीत सुकुमारन हे दोघेही सख्खे भाऊ आहेत. या दोन्ही भावांनी सिनेसृष्टीत पदार्पण केल्यापासून मल्याळम प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. दोघेही भाऊ उत्तम अभिनेते असून त्यांनी आजवर अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. दोघांनाही अभिनयाचा वारसा घरातून मिळाला, कारण त्यांची आई मल्लिका अभिनेत्री व वडील सुकुमारन हे लोकप्रिय अभिनेते होते.

सुकुमारन हे ८० च्या दशकात मल्याळम सिनेमाच्या सुपरस्टार त्रिकुटापैकी एक होते. त्या त्रिकुटातील इतर दोघे म्हणजे मामूट्टी व मोहनलाल होय. १९९७ मध्ये अचानक हृदयविकाराच्या झटक्याने सुकुमारन यांचे ४९ व्या वर्षी निधन झाले. नंतर आईने कुटुंबासमोर आलेल्या सर्व संकटांचा हिमतीने सामना केला, असं इंद्रजीत व पृथ्वीराज यांनी अनेकदा सांगितलंय.

एका गाण्यामुळे रातोरात स्टार बनली मराठमोळी अभिनेत्री, सहा महिन्यात झालेला घटस्फोट; तर दुसरं लग्नही मोडलं, तिचा पहिला पती…

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पृथ्वीराजने त्याच्या आईचं कौतुक केलं. “माझ्या आईचा प्रवास खूप उल्लेखनीय आहे असं मला वाटतं. खरं तर सगळ्या मुलांना आपल्या आईचं कौतुक असणं स्वाभाविक आहे. पण माझ्या आईला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. तिचं पहिलं लग्न अपयशी ठरलं, पण तिला त्यातून बाहेर पडताना अडचणींचा सामना करावा लागला. तिला तिची बाजू कुटुंबासमोर मांडण्यातही अडचणी आल्या,” असं पृथ्वीराज म्हणाला. मल्लिका यांचं पहिलं लग्न जगथी श्रीकुमार यांच्याशी झालं होतं, पण तीन वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला होता.

१७ मिनिटांचा किसिंग सीन अन् ब्लॉकबस्टर सिनेमात काम, एकेकाळी ९०० रुपये महिना कमवायची आमिरची हिरोईन, अजूनही आहे अविवाहित

“त्या काळात एखाद्या परीकथेप्रमाणे, मल्याळम सिनेमातील सर्वात मोठे स्टार (सुकुमारन) अम्माच्या प्रेमात पडले. माझे वडील एका रात्री माझ्या आईच्या घरी गेले आणि तिच्या पालकांना विचारलं, ‘तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न माझ्याशी लावून द्याल का?’ मग आईने त्यांच्याशी दुसरं लग्न केलं, सुखाचा संसार केला आणि २३ वर्षे वैवाहिक जीवनाचा आनंद घेतला,” असं पृथ्वीराज म्हणाला.

प्रसिद्ध अभिनेत्रीशी लग्नानंतर स्वीकारला इस्लाम; घटस्फोट झाल्यावर अभिनेत्याने विदेशी महिलेशी केला निकाह, रमजानबद्दल म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“सगळं सुरळीत चाललं असताना माझ्या वडिलांच्या अचानक जाण्याने आमचं आयुष्य बदललं. ते इतक्या लवकर आम्हाला सोडून जातील, अशी कल्पनाही आम्ही केली नव्हती. एके दिवशी ते तिथे होते आणि दुसऱ्या दिवशी ते नव्हते. तेव्हा मी एका रात्रीत बदललेली अशी स्त्री पाहिली, जिने आयुष्याची २३ वर्षे एक आई आणि पत्नी म्हणून घालवली होती, तिने अचानक कुटुंबाची जबाबदारी घेतली होती. तेव्हा मी दहावीत होतो आणि माझा भाऊ इंजिनिअरींग कॉलेजला प्रवेश घेणार होता. माझी आई त्यावेळी खचली असती तर कदाचित मी आणि माझा भाऊ आज जिथे आहोत तिथे नसतो,” असं तो म्हणाला.