बॉलिवूडची देसी गर्ल अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या विदेशात आहे. कधी कोणत्या सीरिजचं चित्रीकरण तर कधी कोणत्या चित्रपटाच्या चित्रीकरणात प्रियांका व्यस्त असते. तरी देखील प्रियांका भारतीय सणांना कधीच विसरली नाही. प्रियांकाने यंदाची दिवाळी ही लॉस एंजलिसमध्ये असलेल्या तिच्या घरात साजरी केली आहे. त्याचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

प्रियांकाने हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. हे फोटो लॉस एंजलिसमध्ये असलेल्या तिच्या घरातले आहेत. यावेळी प्रियांकाने पूर्ण श्रद्धेने लक्ष्मी देवी आणि गणपतीची पूजा केली. या पूजेत प्रियांकाने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तर पती निक जोनसने पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. हे फोटो शेअर करत “या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः देवी महालक्ष्मीच्या आशीर्वादाने त्यांची कृपा आमच्या घरात आमंत्रित करते”, अशा अशायाचे कॅप्शन दिले आहे.

आणखी वाचा : “या दिवाळीत फटाके फोडू नका तर स्वत:च ‘फटाका’ बना”, प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत

आणखी वाचा : “आता जायची वेळ आली आहे…”, अपघातापूर्वीचा अनसीचा ‘तो’ व्हिडीओ ठरतोय चर्चेचा विषय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या आधी प्रियांकाने दिवाळीच्या पार्टीचे काही फोटो शेअर केले होते. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. या फोटोत प्रियांकाने लहेंगा परिधान केला आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. दरम्यान, प्रियांका लवकरच ‘जी ले जरा’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत आलिया भट्ट आणि कतरिना कैफ दिसणार आहेत.