संपूर्ण जून महिना ‘प्राइड मंथ’ म्हणून जगभरात साजरा केला जातो. हा उत्सव विशेषत: एलजीबीटीक्यू (LGBTQ) समुदायाच्या लोकांसाठी आहे, परंतु यामध्ये प्रत्येकजण सहभागी होऊ शकतो. एलजीबीटीक्यू म्हणजे लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर आणि क्वीअर अशा लोकांसाठी गर्वाचा, अभिमानाचा महिना म्हणून साजरा करण्यात येतो. अभिनेत्री प्रियांका चोप्राने सुद्धा ‘प्राइड मंथ’ साजरा केलाय. नुकतंच तिने कुटुंबीयांसोबत केलेल्या या सेलिब्रेशनचे फोटोज आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.

अभिनेत्री प्रियांका चोप्रा न्यू यॉर्कमध्ये तिच्या कुटुंबीयांसोबत क्वालिटी टाईम घालवत आहेत. नुकतंच तिने आपल्या कुटुंबीयांसोबत प्राइ़ड मंथ साजरा केलाय. याचे फोटोज तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेत. या फोटोमध्ये तिने पांढऱ्या शुभ्र रंगाचा आउटफिट परिधान केलाय. तिचा या आउटफिटची किंमत जवळपास ५० हजार पेक्षा जास्त आहे.

प्राइड मंथच्या शूभेच्छा देणारा एक व्हिडीओ सुद्धा प्रियांका चोप्राने शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्रा प्रेम या विषयावर व्यक्त होताना दिसून आली. तिच्यासाठी प्रेमाची व्याख्या काय आहे आणि किती शक्तिशाली आहे हे या व्हिडीओमध्ये सांगताना दिसून आली. तसंच तुमच्यासाठी प्रेम काय आहे, असं फॅन्सनी विचारत तिला टॅग करत कमेंट करण्याचं आवाहन देखील प्रियांकाने केलंय.

तिने स्वतःचा एक सनकीस व्हिडीओ तयार करून तिच्या फॅन्ससोबत शेअर केलाय. प्रियांका चोप्राने शेअर केलेल्या या फोटोज आणि व्हिडीओजवर फक्त फॅन्सच नव्हे तर इतर सेलिब्रिटी सुद्धा कमेंट करत तिचं कौतुक करताना दिसून येत आहेत. अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या न्यू यॉर्कमध्ये आगामी सीरिज ‘सिटाडेल’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.