अमेरिकन गायक निक जोनस आणि बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा काही महिन्यांपूर्वीच आई-बाबा झाले. प्रियांका चोप्रानं मदर्स डेच्या निमित्त आपल्या मुलीचा पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. प्रियांका आणि निक आपल्या मुलीच्या प्रायव्हसीबाबत खूपच जागरुक आहेत. मात्र तरीही रुग्णालयातील अधिकृत कागदपत्र लीक झाल्यानं त्यांच्या मुलीच्या नावाचा खुलासा झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत निकनं पहिल्यांदा बाबा झाल्यानंतरचा अनुभव शेअर केला.

निकने अलिकडेच ‘द केली क्लार्कसन’ शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्यानं पहिल्यांदाच बाबा झाल्यानंतरचा आणि प्रियांकासोबत मुलीचं संगोपन करण्याबाबतचा अनुभव शेअर केला. तो म्हणाला, “मालतीचं आमच्या आयुष्यात येणं हे एखाद्या जादूप्रमाणे आहे. तिचं आमच्या घरात असणं हे देवाच्या आशीर्वादाप्रमाणे आहे.ती खूपच गोड आहे.” याशिवाय निकनं मालती जेव्हा आयसीयूमध्ये होती त्यावेळी प्रियांका आणि त्याला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागला हे देखील सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान प्रियांका चोप्रानं मदर्स डेच्या निमित्तानं मुलीसोबतचा पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्यासोबत खास नोटही लिहिली होती. तिने लिहिलं होतं, ‘या मदर्स डे दिवशी आम्ही मागच्या काही महिन्यांचा अनुभव शेअर करू इच्छितो. अर्थात याचा अनेकांनी अनुभव घेतला असेल. १०० दिवसांपेक्षा जास्त काळ आयसीयूमध्ये घालवल्यानंतर आम्ही आमच्या छोट्या परीला घरी आणलं आहे. आमची मुलगी घरी आल्याने आम्ही खूप खुश आहोत. मी लॉस एंजेलिसमधील सर्व डॉक्टर, नर्स आणि हॉस्पिटल स्टाफची आभारी आहे. आमच्या आयुष्यातील नव्या अध्यायाची सुरुवात झाली आहे.’