scorecardresearch

“म्हणून मी तिला कॉफी विथ करणमध्ये …” तापसी पन्नूच्या ‘त्या’ वक्तव्यावर करण जोहरने दिलं उत्तर

अजूनपर्यंत तापसीला या कार्यक्रमात निमंत्रण दिलं नसल्याबद्दल करणने खुलासा केला आहे.

“म्हणून मी तिला कॉफी विथ करणमध्ये …” तापसी पन्नूच्या ‘त्या’ वक्तव्यावर करण जोहरने दिलं उत्तर
तापसी आणि करण | taapsee and karan

करण जोहर त्याच्या ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने सध्या चांगलाच चर्चेत आहे. या कार्यक्रमाच्या सातव्या पर्वामध्ये आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. बॉलिवूडबद्दलच्या गॉसिप्समुळे हा शो सतत चर्चेत असतो. या कार्यक्रमाच्या नव्या भागाचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. या तन्मय भट्ट, कुशा कपिला, निहारिका एनएम आणि दानिश सैत हे करणच्या या ज्यूरींनी या फिनाले शोमध्ये हजेरी लावली.

या व्हिडीओमध्ये हे चौघे ज्यूरी मेंबर्स मजामस्ती करताना दिसत आहेत. कार्यक्रमाच्या धाटणीनुसार करण आलेल्या पाहुण्यांना प्रश्न विचारत असतो. पण या भागामध्ये समोर बसलेले पाहुणे त्याला प्रश्न विचारताना दिसत आहेत. याच भागात करणने कित्येक गोष्टींचा उलगडा केला आहे. या प्रोमोमधून करणच्या या शोचं वेगळंच स्वरूप पाहायला मिळणार आहे. या भागात करणने अभिनेत्री तापसी पन्नूविषयी भाष्य केलं आहे. अजूनपर्यंत तापसीला या कार्यक्रमात निमंत्रण दिलं नसल्याबद्दल करणने खुलासा केला आहे.

आणखी वाचा : अभिनेता वरुण धवनने सुपरस्टार सलमान खानबद्दल केलं मोठं विधान; म्हणाला “त्याने ओटीटीवर…”

करण म्हणाला, “या कार्यक्रमात केवळ १२ भाग असतात आणि या १२ भागात खास जोड्या निवडाव्या लागतात. तापसीला मी नक्कीच यासाठी आमंत्रण पाठवणार आहे, तिच्याबरोबर कोणत्या पाहुण्याला आमंत्रण द्यायचं यावर मी नक्की विचार करेन. आणि जर तिने नकार दिलाय तर मात्र मला वाईट वाटेल.”

‘दोबारा’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान तापसीला करण जोहरच्या कार्यक्रमात हजेरी लावली नसल्याबद्दल विचारण्यात आलं. त्यावर तापसीने मजेशीर उत्तर दिलं. तापसी म्हणाली, “कॉफी विथ करणवर मला आमंत्रण मिळावं इतकी माझी सेक्स लाईफ रंजक नाही. माझं आयुष्य फार रटाळ आहे आणि त्याबद्दल सगळ्यांना माहिती आहे.” तापसी आता लवकरच शाहरुखखानच्या आगामी ‘डंकी’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन राजकुमार हिरानी करणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या