अभिनेता पुष्कर जोग त्याचा आगामी चित्रपट ‘ती & ती’च्या निमित्ताने मराठी प्रेक्षकांना लंडनवारी घडवण्यास सज्ज झाला आहे. ‘ती’ असताना ‘ती’च्या येण्याने गांगरलेल्या तरूणाची कथा या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचा पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला असून यामध्ये पुष्करसोबत दिसणाऱ्या त्या दोघी कोण आहेत, हाच प्रश्न अनेकांना पडला आहे.
या पोस्टरमध्ये पुष्कर वैतागलेल्या अवस्थेत दिसत असून दोन तरुणी पाठमोऱ्या बसलेल्या आहेत. या तिघांभोवतीच फिरणारी ही कथा असून अभिनयासोबतच पुष्करने या चित्रपटाची निर्मितीसुद्धा केली आहे. यासंदर्भात तो म्हणाला की, ‘एक निर्माता म्हणून ती अँड तीच्या निमित्ताने बॉलिवूडमध्ये दिसणारी श्रीमंती मराठीमध्ये आणण्याचा मी प्रयत्न केला आहे. मला बाहेरगावी चित्रीत होणाऱ्या चित्रपटांची प्रचंड आवड आहे. या चित्रपटात प्रेमात गोंधळ उडालेल्या तरुणाची भूमिका मी कारत आहे. प्रेक्षकांना हा गोंधळ नक्की भावेल.’
Excited to share my upcoming film's teaser poster Ti &Ti staring me @meSonalee @PrarthanaBehere Directed @mrinal_kulkarni #tiandti pic.twitter.com/G6MEGTZNh6
— Pushkar Jog (@jogpushkar) April 9, 2018
वाचा : टॉपलेस झाल्यामुळे श्री रेड्डीवर बेघर होण्याची वेळ
विराजस कुलकर्णीने या चित्रपटाची कथा लिहिली असून मृणाल कुलकर्णीने दिग्दर्शन केलं आहे. गुझबम्प एंटरटेनमेंट आणि हायपरबीस मिडिया निर्मित या चित्रपटाची निर्मिती पुष्कर जोग आणि मोहन नाद्दर यांनी केली असून मोहित छाब्रा या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.
पुष्कर जोगसोबत ‘ती & ती’च्या भूमिकेत सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहरे मुख्य भूमिकेत आहेत.