Pushpa 2 Box Office Collection Day 19 : अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ने सध्या जगभरात धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळत आहे. पहिल्याच दिवशी तब्बल १६४.२५ कोटींची कमाई करत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एक नवीन रेकॉर्ड बनवला होता. आता येत्या वीकेंडपर्यंत हा सिनेमा १६०० कोटींच्या घरात प्रवेश करत ‘बाहुबली २’ आणि ‘दंगल’ या दोन सिनेमांच्या ऑल टाइम कलेक्शनला टक्कर देईल असं चित्र निर्माण झालेलं आहे.

‘सॅकनिल्क’ने दिलेल्या माहितीनुसार ‘Pushpa 2’ने पहिल्या आठवड्यात देशभरात ७२५.८ कोटींची कमाई केली होती. यानंतर चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यात २६४.८ कोटी कमावले. यानंतर बॉक्स ऑफिसवर १६ व्या दिवशी १४.३ कोटी, १७ व्या दिवशी २४.७५ कोटी आणि १८ व्या दिवशी म्हणजेच तिसऱ्या रविवारी या चित्रपटाने ३२.९५ कोटी कमावले.

हेही वाचा : Bigg Boss 18: नॉमिनेशन टास्कमध्ये श्रुतिका अर्जुनला दिला ‘हा’ महत्त्वाचा अधिकार; विवियन डिसेना, चाहत पांडेसह सात सदस्य झाले नॉमिनेट

तिसऱ्या सोमवारी Pushpa 2 च्या कमाईत घसरण

तिसऱ्या सोमवारी ( १९ वा दिवस – २३ डिसेंबर ) चित्रपटाच्या कमाईत ६२ टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली. १९ व्या दिवशी Pushpa 2 ने फक्त १२.२५ कोटी कमावले आहेत. या १२.२५ कोटीमध्ये तेलुगू भाषेत २.२ कोटी, हिंदी भाषेत ९.७५ कोटी, तामिळ भाषेत २५ लाख तर, कन्नड आणि मल्याळम भाषेत अनुक्रमे फक्त ४ लाख आणि १ लाख रुपये चित्रपटाने कमावले आहेत. त्यामुळे चित्रपटाची १९ व्या दिवसाची कमाई १२.२५ कोटी इतकी असून ही तुलनेने अन्य दिवसांपेक्षा कमी आहे.

मात्र, जर चित्रपटाच्या एकूण कलेक्शनचा विचार केला तर आतापर्यंत १९ दिवसांत चित्रपटाने फक्त देशात १०७४ कोटींचा गल्ला जमावला आहे. तर, जगभरात १५०६.७ कोटींची कमाई केली आहे. यामुळे येत्या वीकेंडपर्यंत ‘पुष्पा २’ सहज १६०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करेल हे स्पष्ट होत आहे.

हेही वाचा : Allu Arjun : अल्लू अर्जुन पुन्हा अडचणीत; चेंगराचेंगरीनंतर आता ‘पुष्पा २’मधील ‘या’ सीनवरून वाद, काँग्रेस नेत्याने केली तक्रार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता ‘पुष्पा २’ला हिंदी बॉक्स ऑफिसवर टक्कर देण्यासाठी वरुण धवनचा ‘बेबी जॉन’ सिनेमा प्रदर्शित होत आहे. यामध्ये वरुण धवन, कीर्ती सुरेश आणि वामिका गब्बी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आता वरुणच्या चित्रपटाच्या परिणाम पुष्पावर होणार की, अल्लू अर्जुनचा सिनेमा आपली यशस्वी घोडदौड कायम ठेवणार याचं चित्र येत्या वीकेंडला स्पष्ट होईल.