बॉलिवूड अभिनेता सलमान खान मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. सलमानचा ‘राधे: युअर मोस्ट वॉण्टेड भाई’ हा चित्रपट १३ मे रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म आणि चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अभिनेता सलमान खानचा हा चित्रपट त्यातली गाणी आणि प्रोमोमुळे बराच चर्चेत आहे. परंतू आणखी एका नव्या कारणांमुळे हा चित्रपटा चर्चेत आलाय. अभिनेता सलमान खानच्या ‘राधे’ फिल्मला सेन्सॉर बोर्डने पास केलंय. त्याच्या चित्रपटाला सेन्सॉरकडून सर्टिफिकेट मिळाल्यानंतर ‘राधे’ च्या मेकर्सनी परस्पर २१ कट केले असून अनेक बदलही केले असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
बॉलिवूडचा ‘दबंग’ अभिनेता सलमान खान याचा बहूचर्चित ‘राधे’ चित्रपट रिलीज होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहीले आहेत. प्रभूदेवा दिग्दर्शित ‘राधे’ चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने यू/ए सर्टिफिकेट देऊन पास देखील केलं. परंतू सेन्सॉरने सर्टिफिकेट दिल्यानंतर या चित्रपटात परस्पर काही दृश्य कट केले असून त्यात बदल देखील करण्यात आले आहेत. यात काही दृश्य अशी जोडली आहेत जी प्रेक्षक त्यांच्या कुटूंबासोबत बसून बघू शकत नाहीत.
View this post on Instagram
‘राधे’ चित्रपट हा फॅमिली एंटरटेनींग आहे, असं अभिनेता सलमान खान आणि निर्मात्यांचं म्हणणं आहे. करोना परिस्थितीमुळे हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील रिलीज करण्यात येणार आहे. त्यामूळे हा चित्रपट घर बसल्या पाहता येणार असल्याने मोठ्या प्रमाणात प्रेक्षकवर्ग असणार आहे. त्यामूळे ‘राधे’ चित्रपटाच्या टार्गेट ऑडियन्सचा विचार करून काही दृश्य गाळण्याचा निर्णय ‘राधे’ च्या मेकर्सनी घेतला. यातील एका दृध्यात तरूण ड्रग्स घेताना दाखवण्यात आला होता. तर आणखी एक सेकंदाच्या सीनमध्ये ड्रग्सच्या अतिसेवनामुळे नशेच्या आहारी गेलेला दाखवण्यात आला आहे. प्रेक्षकांच्या डोळ्याची पापणी पण लवत नाही इतक्या वेळेचा सीन ‘राधे’ च्या निर्मात्यांनी कट केला आहे. तसंच चार वेगवेगळ्या ठिकाणी शूट केलेले अॅक्शन शॉट देखील निर्मात्यांनी काढले आहेत. हे शॉट हिंसाचाराला प्रोत्साहन देणारे ठरू शकले असते, असं बोललं जातंय.
View this post on Instagram
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
याशिवाय ‘राधे’ चित्रपटात काही दृश्यांसह संवाद देखील निर्मात्यांनी गाळले आहेत. या चित्रपटात ‘जय महाराष्ट्र’ असा डायलॉग वापरण्यात आला होता. त्याऐवजी आता निर्मात्यांनी ‘स्वच्छ भारत सह स्वच्छ मुंबई’ असा डायलॉग नव्याने टाकण्यात आलाय. त्याचप्रमाणे चित्रपटाच्या शेवटी सिटी वाईड शॉट देखील नव्याने जो़डण्यात आलाय.
सेन्सॉर बोर्डाने सर्टिफिकेट दिल्यानंतर अभिनेता सलमान खानच्या ‘राधे’ चित्रपटाची वेळ ही ११७ मिनिटं आणि ५५ सेकंद इतका होता. परंतू त्यानंतर निर्मांत्यांनी परस्पर केलेल्या बदलांनतर या चित्रपटाची वेळ कमी होऊन ती ११४ मिनिटं आणि २४ सेकंद इतकी झालेली आहे.
या चित्रपटातील सीन कट केल्यामुळे बॉलिवूडचा ‘दबंग’ अभिनेता सलमान खानच्या आतापर्यंतच्या करियरमधली सर्वात लहान चित्रपट ठरणार आहे.
View this post on Instagram
या चित्रपटामध्ये सलमानबरोबर अभिनेत्री दिशा पाटणी, रणदीप हूडा आणि जॅकी श्रॉफ मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. प्रभु देवा दिग्दर्शित हा चित्रपट 13 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. थिएटर व्यतिरिक्त प्रेक्षक ‘झी 5’वर ‘पे पर व्हू सेवा ZEEplex सोबतच भारतातील सर्व प्रमुख ओटीटी प्लॅटफॉर्म जे ‘झी 5’शी संबंधित आहेत, तसेच डिश, डी 2 एच, टाटा स्काय आणि एअरटेल हे प्रमुख डीटीएच ऑपरेटर डिजिटलवर हा चित्रपट पाहण्यास सक्षम असतील आणि प्रेक्षकांना त्यांच्या सोयीनुसार चित्रपट पाहण्याचे अनेक पर्याय उपलब्ध करुन दिले जातील.