बॉलिवूड बादशहा शाहरुख खान आणि ‘रईस’चीपूर्ण टीम सध्याच्या घडीला गडगंज श्रीमंत झाली आहे म्हणायला हरकत नाही. बॉक्स ऑफिसवर ‘रईस’ चित्रपटाने केलेली दमदार कमाई पाहिल्यानंतर शाहरुखसह रईस टीम खऱ्या अर्थाने श्रीमंत झाल्याचे काणीही मान्य करेल. या चित्रपटाने १०० कोटीपेक्षा अधिक कमाई करत बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटामध्ये स्थान मिळविले आहे. चित्रपटाला प्रेक्षकानी भरभरुन दिलेल्या प्रतिसादाबद्दल सध्या शाहरुख आभार मानताना दिसत आहे. ज्याप्रमाणे शाहरुखने चित्रपटाच्या प्रमोशनसाठी भटकंती केली होती अगदी तशीच भटकंती सध्या तो यश मिळाल्यानंतरही करताना दिसते. प्रेक्षकांनी दाखविलेल्या प्रेमाबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी शाहरुख वेगवेगळ्या शहरातील चाहत्यांच्या भेटी देताना दिसते.
.@iamsrk turns up the charm with the ladies of @SEWABharat. #RaeesInAhmedabad pic.twitter.com/LMMP6Oscjj
— Raees (@RaeesTheFilm) February 1, 2017
‘रईस’ चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर शाहरुखने नुकताच गुजरात दौरा केला. यावेळी शाहरुखने काही महिलांचीही भेट घेतल्याचे पाहायला मिळाले. ज्यामध्ये त्याने स्वयंसेवक महिला संघटनेच्या महिला चाहत्यावर्गाला आवर्जून भेट दिली. या भेटीत ७० वर्षाच्या वृद्ध महिला चाहतीचे शाहरुखने अनोख्या अंदाजात आभार मानले. तूला कधीही विसरु शकणार नसल्याचे सांगण्यासाठी शाहरुखने या महिलेसमोर त्याच्या ‘जब तक है जान..’ चित्रपटातील संवाद फेकीने मनं जिंकण्याचा प्रयत्न केला. आजीबाईंना जब तक जान..ही ओळ ऐकवताना गुडघ्यावर बसून शाहरुखने प्रेम व्यक्त केले. शाहरुखचा हा अनोखा अंदाज पाहून ही महिला चांगलीच भारावून गेल्याचे दिसले. शाहरुखच्या चाहत्यांमध्ये फक्त १५ वर्षाच्या तरुण-तरुणाईचाच समावेश नाही. तर ७० वर्षाची आजीबाई देखील शाहरुखच्या चाहत्यांच्या यादीत आहे. याची प्रचिती गुजरातमधील या दृश्याने येते.
यापूर्वी शाहरुख खानच्या पुणे दौऱ्याची देखील चांगलीच चर्चा रंगली होती. पुण्यातील सिम्बायोसिस कॅम्पसमध्ये शाहरुख तरुणींच्या गराड्यात दिसला होता. सिम्बायोसिसच्या कॅम्पसमधील तरुणींसोबतचा एक सेल्फी चांगलाच व्हायरल झाला होता. शाहरुखच्या सेल्फीमध्ये अनेक तरुणींसोबत हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान करुन उभी असणारी तरुणीने नेटीझन्सना घायाळ केले होते. नेटीझन्संनी शाहरुखच्या या फोटोवर अनेक प्रतिक्रिया नोंदविल्याचेही पाहायला मिळाले. कोणी या तरुणीला सौंदर्यवतीची उपमा देताना दिसले. तर कोणी तिची तुलना चक्क मॉडेलसोबत करताना दिसले. या सेल्फीतील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या सौंदर्यवती तरुणीच्या संदर्भात शाहरुखने देखील ट्विटरच्या माध्यमातून टीपण्णी केली होती.