बॉलीवूड अभिनेता अजय देवगण सध्या ‘रेड २’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट १ मे रोजी म्हणजेच आज प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रेड’ या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे.

राज कुमार गुप्ता दिग्दर्शित या चित्रपटात अजय देवगण, वाणी कपूर आणि रितेश देशमुख यांच्या प्रमुख भूमिका आहेत. पण प्रदर्शित होताच चित्रपटाला मोठा झटका बसला आहे. अजय देवगण, वाणी कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा काही साइट्सवर ऑनलाइन लीक झाला आहे.

‘रेड २’ रिलीज होताच ऑनलाइन झाला लीक…

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, अजय देवगणचा ‘रेड २’ रिलीज झाल्यानंतर काही तासांतच लीक झाला. हा चित्रपट तामिळरॉकर्स, टेलिग्राम, मुव्हीरुल्झ आणि फिल्मीझिला सारख्या साईट्सवर एचडी प्रिंटमध्ये उपलब्ध आहे. चित्रपटाच्या कलेक्शनवर खूप वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. हे पहिल्यांदाच घडलेले नाही. याआधीही सलमान खानचा ‘सिकंदर’ चित्रपट प्रदर्शित होताच लीक झाला होता.

अजय देवगणचा हा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रेड’चा सिक्वेल आहे. मात्र, यावेळी चित्रपटात काही पात्र वेगळी दिसत आहेत. चित्रपटाच्या दुसऱ्या भागात, अजय देवगणची टक्कर रितेश देशमुखसोबत होत आहे. पण ऑनलाइन लीक झाल्यानंतर, आता हा चित्रपट पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर किती कमाई करू शकतो हे पाहणे मनोरंजक ठरेल.

ओटीटीवर ‘रेड २’ हा चित्रपट जून महिन्याच्या अखेरीस किंवा जुलैच्या सुरुवातीला प्रदर्शित होऊ शकतो. एखादा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर त्याला सर्वसाधारणपणे 60 दिवसांचा अवधी दिला जातो. त्यानंतर तो चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित केला जातो.

‘रेड २’ मध्ये पुन्हा एकदा अजयने आयकर विभाग अधिकारी अजय पटनायकची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात अभिनेत्री वाणी कपूर त्याच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात अभिनेते सौरभ शुक्ला यांचीही महत्त्वाची भूमिका आहे. अजय पहिल्यांदाच वाणीसोबत स्क्रीन शेअर करत आहे.