बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव गर्लफ्रेण्ड पत्रलेखासोबत १५ नोव्हेंबरला म्हणजेच आज विवाहबंधनात अडकणार आहे. १३ नोव्हेंबरला दोघांचा साखरपुडा झाला. या साखरपुड्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. त्यानंतर १४ नोव्हेंबरला मेहंदी आणि संगीत सोहळा पार पडला. राजकुमार आणि पत्रलेखाच्या विवाह सोहळ्यात फक्त खास पाहुण्यांची उपस्थिती असणार आहे. तर लग्नपूर्वीच दोघांच्या लग्नाची पत्रिका समोर आली आहे. सोशल मीडियावर या लग्नपत्रिकेचा फोटो व्हायरल होतोय.

राजकुमार आणि पत्रलेखाच्या लग्नाची पत्रिका समोर आल्याने त्यांच्या लग्नाची तारीख आणि ठिकाण कोणतं आहे हे समोर आलं आहे. राजकुमार रावच्या एका फॅन पेजने हे कार्ड सोशल मीडियावर शेअर केलंय. व्हायरल होणारी ही लग्नपत्रिका पत्रलेखाची आहे. यात ‘पत्रलेखा आणि राजकुमार रावच्या विवाहसोहळ्यासाठी सोमवारी १५ नोव्हेंबरला चंदीगढमधील ओबेरॉय सुखविलासमध्ये आमंत्रित करत आहोत’ असं म्हंटलंय.

“मी देखील अगदी अशीच होते”; अनुष्का शर्माने सांगितला मुलीमधील ‘तो’ गुण

यापूर्वी राजकुमार आणि पत्रलेखाच्या साखरपुड्याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या सोहळ्याची थीम पांढऱ्या रंगाची होती हे फोटो पाहून लक्षात येतंय. तर व्हिडीओमध्ये राजकुमार रोमॅण्टिक स्टाइलने गुडघ्यावर बसत पत्रलेखाला अंगठी घालत असल्याचं दिसतंय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजकुमार आणि पत्रलेखाच्या विवाहसोहळ्यासाठी फराह खान, हुमा कुरैशी, साकिब सलीम, अदिति राव हैदरी हे सेलिब्रिटी आधीच चंदीगढमध्ये दाखल झाले आहेत.