रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्याने पुन्हा दिग्दर्शनातून कमबॅक केला आहे. ऐश्वर्याचा बहुचर्चित ‘लाल सलाम’ हा चित्रपट नुकताच बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात विक्रांत व विष्णु हे दोघेही मुख्य भूमिकेत आहेत तर रजनीकांत एका पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. धार्मिक एकोप्याविषयी भाष्य करणारा हा एक स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट आहे अन् एका चित्रपटाचा विषयही तितकाच संवेदनशील आहे.

रजनीकांत यांच्या ‘जेलर’नंतर प्रेक्षकांना त्यांच्या या आगामी चित्रपटाबद्दल फार उत्सुकता होती. परंतु बॉक्स ऑफिसवर मात्र प्रेक्षकांना खेचून आणण्यात ‘लाल सलाम’ तितका यशस्वी ठरलेला नाही हे याच्या पहिल्या दिवसाच्या कमाईवरुन स्पष्ट होत आहे. हा चित्रपट क्रिकेट हा खेळ, त्याभोवतालचं सामाजिक वातावरण, राजकारण आणि मोईद्दीन भाई यांच्याभोवती फिरताना दिसत आहे.

आणखी वाचा : ‘हीरामंडी’ : एक ‘शाही मोहल्ला’ की वेश्या व्यवसायाचं केंद्रस्थान? भन्साळींच्या आगामी सीरिजमागचा इतिहास जाणून घ्या

इंडस्ट्री ट्रॅकर ‘सॅकनिल्क’च्या रीपोर्टनुसार ‘लाल सलाम’ने पहिल्याच दिवशी केवळ ४.३० कोटींची कमाई केली आहे. रजनीकांत यांच्या करिअरमधील पहिल्याच दिवशी सर्वाधिल कमी कमाई करणारा ‘लाल सलाम’ हा पहिला चित्रपट ठरला आहे. रजनीकांत यांची लोकप्रियता पाहता या चित्रपटाच्या कमाईचे आकडे नक्कीच निराशाजनक आहेत. चित्रपटात बरंच नाट्य, राजकीय व सामाजिक भाष्य, आणि हलकीशी लव्ह स्टोरीदेखील पाहायला मिळत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चित्रपटात रजनीकांत यांचा हटके लुक आणि एक वेगळाच स्वॅग पाहायला मिळत आहे. चाहत्यांना रजनीकांत यांचा हा नवा लूक चांगलाच पसंत पडला आहे. या चित्रपटाचं संगीत ऑस्कर विजेते ए.आर रहमान यांनी दिलं असून हा चित्रपट तमिळ, तेलुगू, मल्याळम, हिंदी, कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. ‘जेलर’ने पहिल्याच दिवशी ५० कोटींची कमाई केली होती. त्यामानाने ‘लाल सलाम’ची सुरुवात फारच निराशाजनक झाली असल्याचं स्पष्ट होत आहे.