scorecardresearch

‘लग्नानंतर पत्नीला घरकामात मदत करतोस का?’ राजकुमार राव म्हणाला, “मी भांडी आणि झाडू…”

राजकुमार रावने लग्नानंतर त्याच्या आयुष्यात काय बदल झाले? याबद्दल सांगितले आहे.

rajkummar rao patralekha
राजकुमार राव पत्रलेखा

बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. राजकुमार राव हा अवघ्या काही महिन्यांपूर्वीच त्याची प्रेयसी पत्रलेखासोबत विवाहबंधनात अडकला. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले. त्यासोबत ते दोघेही अनेकदा एकमेकांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. नुकतंच एका मुलाखतीत राजकुमार रावने लग्नानंतर त्याच्या आयुष्यात काय बदल झाले? याबद्दल सांगितले आहे.

नुकतंच इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह ईस्ट २०२२ या कार्यक्रमादरम्यान राजकुमार रावने लग्नानंतर त्याच्या खासगी आयुष्याबद्दल सांगितले आहे. यावेळी राजकुमार राव म्हणाला, “मी पत्रलेखाला घरातल्या कामात मदत करतो. मी घरात सर्वसामान्यांप्रमाणे वावरतो. मी पडद्यावर नेहमी खऱ्याखुऱ्या भूमिका साकारतो. त्यामुळे घरात तसेच असणे हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे.”

राजकुमार राव आणि पत्रलेखा ‘या’ अलिशान रिसॉर्टमध्ये घेणार सप्तपदी, एका रात्रीचे भाडे माहितीये का?

“मी आणि पत्रलेखा एकत्र घरकाम करतो. मला सर्व काही नीटनेटके ठेवायला आवडते. मी अनेकदा तिने नीट केलेल्या सर्व गोष्टी पुन्हा व्यवस्थित लावून ठेवतो. मला भांडी घासणे आणि झाडू मारणे ही काम करणे आवडते. त्यातही मला भांडी घासायला आवडतात”, असे राजकुमार म्हणाला.

पाहा व्हिडीओ –

“मी लहान असताना आईसोबत ही काम करायचो. माझी आई एकटी ती सर्व काम करत असल्याचे पाहून मला फार दु:ख व्हायचे. त्यामुळे मी ती काम करुन ठेवायचो. त्यावेळी मला झाडू मारणे किंवा साफसफाई करणे आवडायचे”, असेही त्याने सांगितले.

“पत्रलेखाशी लग्न केल्यानंतर…”, राजकुमार रावने दोन महिन्यानंतर केला वैवाहिक जीवनाबद्दल खुलासा

राजकुमार आणि पत्रलेखा हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असतात. ‘सिटी लाईट्स’ या चित्रपटाच्या निमित्ताने दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती. या चित्रपटात राजकुमार आणि पत्रलेखा यांनी मुख्य व्यक्तिरेखा साकारल्या होत्या. राजकुमार आणि पत्रलेखा गेल्या १० वर्षांपासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते दोघेही लिव इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. काही महिन्यांपूर्वीच ते लग्न बंधनात अडकले.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rajkummar rao on helping wife patralekha in household chores nrp

ताज्या बातम्या