दाक्षिणात्य अभिनेता राम चरणचे देशभरात चाहते आहेत. नुकत्याच आलेल्या ‘आरआरआर’ सिनेमातून राम चरणने प्रेक्षकांची पुन्हा एकदा मनं जिंकली आहेत. राम चरणच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर राम चरण आणि त्याची पत्नी उपासना यांच्या लग्नाला नुकतीच १० वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळे आता दोघं कधी गोड बातमी देणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. असं असलं तरी अद्याप आई व्हायचं नाही असा खुलासा राम चरणची पत्नी उपासनाने केलाय. यामागचं कारणही तिने स्पष्ट केलंय.
नुकत्याच पार पडलेल्या 17 व्या एटीए अधिवेशनात, राम चरणची पत्नी उपासनाने सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्याशी संवाद साधला. यावेळी उपासनाने तिला अद्याप मुल नको असा खुलासा केला. समाजातील लोक कायमच नातं, जीवनातील ध्येय आणि आई कधी होणार? असे प्रश्न विचारत असल्याचं ती म्हणाली. वाढत्या लोकसंख्येचं संतुलन राखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं ती म्हणाली.
आणखी वाचा: ‘आरआरआर’ ही एक गे लव्हस्टोरी; आलिया भट्ट तर फक्त….’
यावेळी सद्गुरूंनी उपासनाच्या विचारांचं कौतुक केलं. ते म्हणाले, “मानवाला त्याच्या पावलांवर पाऊल ठेवणाऱ्यांची चिंता आहे.पण जर मानवी पावलांचे ठसे कमी झाले तर ग्लोबल वॉर्मिंगचीही काळजी करण्याची गरज नाही. त्यामुळे काही स्त्रीया आई न होण्याचा निर्णय घेत आहेत हे पाहून बरं वाटतं” . यावर उपासना म्हणाली “मी लवकरच माझ्या सासू आणि आईशी तुमची भेट घडवून देईन”.
तर राम चरणने देखील यापूर्वी अद्याप कुटुंब वाढवण्याचा विचार नसल्याचा खुलासा केला होता. दोघांनाही सध्या मुल नको असल्याचं तो म्हणाला होता. लोकप्रिय अभिनेते चिरंजीवीचा मुलगा असल्याच्या नात्याने प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याची जबाबदारी आहे आणि जबाबदारी पूर्ण करण्यासाठी त्याला सध्या मुल नको असं तो म्हणाला होता. तसचं उपासनाचेही काही प्लॅन्स आहेत आणि त्यासाठी दोघांना सध्यातरी मुलं नको असं राम चरणने स्पष्ट केलं होतं.
उपासना अपोलो चॅरिटीची वाइस प्रेसिटंड आणि बी पॉझिटिव्ह मासिकाची संपादक आहे. कॉलेजमध्येच दोघांची ओळख झाली होती. १४ जून २०१२ मध्ये दोघं विवाहबंधनात अडकले.