बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या लग्नाच्या चर्चांना मागच्या काही दिवसांपासून उधाण आलं आहे. चाहत्यांना दोघांच्या लग्नाबाबत कमालीची उत्सुकता आहे. रणबीर आणि आलिया यांनी याबाबत अद्याप मौन बाळगलं असलं तरीही या दोघांच्या लग्नाबाबत आता आणखी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. त्यांच्या लग्नाची तारीख बदलल्याचं म्हटलं जातं आहे.

आलिया आणि रणबीरच्या लग्नाची चर्चा असताना, लग्नाच्या तारीखेत गोंधळ निर्माण झाला आहे. १४ किंवा १५ एप्रिलला ते लग्न बंधणात अडकणार असल्याचे म्हटले जातं होते. याआधी, आलिया भट्टचे काका, रॉबिन भट्ट यांनी ‘आज तक’ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले की १३ एप्रिल रोजी मेहंदी सोहळा होणार आहे आणि त्यांचे लग्न १४ एप्रिल रोजी होणार आहे. आता, आलियाचा सावत्र भाऊ राहुल भट्टने ‘आज तक’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की आलिया आणि रणबीरने लग्नाची तारीख बदलण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल म्हणाला, त्या दोघांनी आधी १४ एप्रिल ही लग्नाची तारीख ठरवली होती. पण मीडियामध्ये माहिती लिक झाल्यानंतर आता तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

आणखी वाचा : “छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर…”, ‘शेर शिवराज’ चित्रपटात अफजल खानाची भूमिका साकरणारे मुकेश ऋषी यांचे वक्तव्य चर्चेत

आणखी वाचा : महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्रस्थान असलेला शरद पवार यांचा ‘सिल्व्हर ओक’ बंगला आतून कसा दिसतो, पाहा फोटो

राहुल म्हणाला, “लग्न होणार, हे सर्वांना माहीत आहे. पण १३ किंवा १४ एप्रिलला लग्न होणार नाही. ही खात्रीशीर गोष्ट आहे. खरं तर, याआधीच्या तारखा त्याच होत्या, पण ही माहिती मीडियामध्ये लीक झाल्यानंतर. , तारखा बदलण्यात आल्या आहेत. मी माझा शब्द देतो की १३ किंवा १४ एप्रिलला लग्न होणार नाही. माझ्या माहितीनुसार, लवकरच तारखेबाबत घोषणा होईल.” २० एप्रिलपर्यंत लग्न होणार असल्याचेही त्याने स्पष्ट केले.

आणखी वाचा : “तू तर रोजा पाळत नाही किमान मुलांना तरी…”, रमजानच्या महिन्यात हॉटेलमध्ये गेल्यामुळे नेटकऱ्यांनी केले ट्रोल

दरम्यान, रणबीर आणि आलिया यांच्या लग्नात त्यांचे काही जवळचे मित्र आणि कुटुंबातील काही सदस्य हजेरी लावणार आहेत. रणबीरची इच्छा आहे की त्याने अनेक वर्षे काम केलेल्या टेक्निशियने देखील त्याच्या लग्नात हजेरी लावावी. त्याच्या लग्नात बेस्ट फ्रेंड अयान मुखर्जी, करण जोहर, आदित्य रॉय कपूर हे उपस्थित असणार आहेत.