Ranveer Singh Film Dhurandhar Teaser Out : बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंहने त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या चाहत्यांना एक मोठे सरप्राईज दिले आहे. अभिनेत्याच्या आगामी ‘धुरंधर’ चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे.
टीझरमध्ये रणवीरचा अद्भुत अवतार पाहायला मिळाला आहे, ज्यामुळे चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. या खास प्रसंगी निर्मात्यांनी ‘धुरंधर’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे.
लांब केस, वाढलेली दाढी आणि तोंडात सिगारेट, ‘धुरंधर’ चित्रपटातील रणवीर सिंहचा दमदार लूक समोर आला आहे. हा एक गँगस्टर ड्रामा चित्रपट आहे, ज्यामध्ये अनेक महान कलाकार दिसणार आहेत. चित्रपटाच्या टीझरमध्ये संजय दत्तपासून अर्जुन रामपालपर्यंत सर्वांची झलक पाहायला मिळाली आहे. इन्स्टाग्रामवर टीझर शेअर करताना रणवीर सिंहने लिहिले- ‘अ नर्क विल राइज, विल रिव्हिल द ट्रू स्टोरी ऑफ अननोन मेन.’
‘धुरंधर’चा टीझर कसा आहे?
टीझरबद्दल बोलायचे झाले तर, तो तुम्हाला नक्कीच आश्चर्यचकित करेल. प्रत्येक सीन पाहिल्यानंतर आणि बॅकग्राउंड म्युझिक ऐकल्यानंतर तुम्ही चित्रपट पाहण्याची वाट पाहाल. लांब केस, दाढी, भयानक लूक, उत्तम अॅक्शन हे पाहिल्यानंतर, तुम्ही काही काळासाठी ‘अॅनिमल’मधील रणबीर कपूरला विसरून जाल. ‘धुरंधर’चा टीझर रणवीर सिंहच्या गँगस्टर अवताराची झलक आणि आर. माधवनच्या आवाजातील दमदार डायलॉग्सने सुरू होतो. टीझरमध्ये खूप रक्तपात दिसून येत असून, हा चित्रपट ॲक्शन्सनी भरलेला आहे. चित्रपटात रणवीर सिंह अभिनेत्री सारा अर्जुनबरोबर रोमान्स करताना दिसणार आहे.
‘धुरंधर’ कधी प्रदर्शित होणार?
आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ हा गँगस्टर-ड्रामा चित्रपट लोकेश धर व ज्योती देशपांडे यांनी निर्मिती केला आहे. या चित्रपटात रणवीर सिंह मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याशिवाय संजय दत्त, अर्जुन रामपाल, आर. माधवन व अक्षय खन्ना हेदेखील चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. चित्रपटाच्या टीझरमध्ये सर्व कलाकार पूर्ण अॅक्शन मोडमध्ये दिसू शकतात.
आदित्य धर दिग्दर्शित हा चित्रपट ५ डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. विशेष म्हणजे प्रभासचा हॉरर कॉमेडी ‘द राजा साब’देखील त्याच दिवशी प्रदर्शित होत आहे. अशा परिस्थितीत दोन मोठ्या कलाकारांमध्ये अशी जोरदार टक्कर पाहणे मजेदार असेल. हा चित्रपट खास असणार आहे.