अभिनेत्री शमिता शेट्टी आणि राकेश बापट सध्या इंडस्ट्रीमधील लोकप्रिय जोडी मानली जाते. बिग बॉस ओटीटीनंतर या दोघांमधील जवळीक वाढली आणि त्यानंतर सोशल मीडियावर या दोघांच्या नात्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. एवढंच नाही तर शमिताच्या वाढदिवशीही राकेश तिच्या कुटुंबीयांसोबत दिसला. मात्र मागच्या काही दिवसांपासून या दोघांच्या नात्यात दुरावा आल्याचं बोललं जात आहे. अलिकडेच एका मुलाखतीत शमिताबद्दल बोलताना राकेशनं असं काही वक्तव्य केलं की त्यांच्या चाहत्यांनाही धक्का बसला.

हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत राकेश बापट शमिता शेट्टी आपली गर्लफ्रेंड आहे हे सांगताना अडखळलेला दिसला. त्याऐवजी शमिता आपली चांगली मैत्रीण असल्याचं त्यानं सांगितलं. एवढंच नाही तर त्या दोघांमध्ये कोणतंही नातं नाही तर एक खास बॉन्डिंग असल्याचं त्यानं सांगितलं.

Savitribai Khanolkar Marathi name for designing the Param Vir Chakra award
सावित्रीबाई खानोलकर… परमवीर चक्र पुरस्काराचं डिझाईन करणारं मराठमोळं नाव
MNS Gave Answer to Uddhav Thackeray
उद्धव ठाकरेंना मनसेचा टोला, “कंबरेचं काढून डोक्याला गुंडाळलेले ‘शर्त’ आणि ‘शर्ट’ असले…”
Nana Patole Washing Feet
कार्यकर्त्याने पाय धुतल्याचा VIDEO व्हायरल झाल्यानंतर नाना पटोलेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, “कार्यकर्ता वरून…”
Kamran Akmal controversial remark
‘१२ बजे के बाद सिख’; थट्टेचा विषय की अभिमानाची कहाणी?
narendra modi request to remove Modi Ka Parivar
“सोशल मीडियावरील ‘मोदी का परिवार’ आता हटवा”; पंतप्रधानांची भाजपा नेते, कार्यकर्त्यांना विनंती!
Luv Sinha reacts on Sonakshi Sinha zaheer iqbal wedding
शत्रुघ्न सिन्हांनंतर आता सोनाक्षी सिन्हा-झहीर इक्बालच्या लग्नाबद्दल तिच्या भावाची प्रतिक्रिया, म्हणाला, “मी सध्या…”
Chhaya Kadam Nagraj manjule friendship
“नागराजसारखा माणूस मित्र म्हणून आयुष्यात असावा, कारण…”; अभिनेत्री छाया कदम यांचे वक्तव्य
MP Swati Maliwal
अरविंद केजरीवालांना अटक झाली तेव्हा स्वाती मालिवाल अमेरिकेत का होत्या? खुलासा करत म्हणाल्या “आप कार्यकर्त्यांनी…”

आणखी वाचा- विवेक अग्निहोत्रींच्या विरोधात तक्रार दाखल, भोपाळी लोकांबाबतचं ‘ते’ आक्षेपार्ह विधान भोवलं

राकेश म्हणाला, ‘एक एनर्जी असते, जी दोन व्यक्तींना एकत्र आणते. आम्ही आनंदी आहोत. ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे. जर तुमची मैत्री चांगली असेल तर कोणत्याही गोष्टीचा त्यावर परिणाम होत नाही. तिचं मन खूप चांगलं आहे. जे प्रामाणिक आहेत त्यांचा मी आदर करतो. आमच्या बऱ्याच आवडी निवडी सारख्या आहेत.’

आणखी वाचा- शरद पवारांच्या नातवाचा प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत फोटो व्हायरल, चर्चांना उधाण

याशिवाय जेव्हा त्याला तुम्ही रिलेशनशिपमध्ये आहात का असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यावर उत्तर देताना तो म्हणाला, ‘मी याला रिलेशनशिप म्हणणार नाही. हा एक चांगला बॉन्ड आहे. आपण फक्त एखाद्या गोष्टीला नाव देण्याच्या मागे असतो. पण हे असं आहे की, जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांसोबतचा सहवास एन्जॉय करतात. तेव्हा त्याला नाव दिलं तर तो एक नेम गेम होतो. मी शमिताचा नेहमीच आदर करतो.’