अभिनेत्री रश्मिका मंदाना नुकतीच विजय देवरकोंडाच्या कुटुंबाबरोबर हैदराबादमधील थिएटरमध्ये तिचा नवीन चित्रपट ‘पुष्पा २: द रूल’ पाहताना दिसली. यामुळे या जोडीच्या नात्याबद्दलच्या चर्चांना अधिक उधाण आले आहे.

रश्मिका मंदानाची चित्रपटगृहातील उपस्थिती

रश्मिकाचा थिएटरमधील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत ती विजय देवरकोंडाची आई माधवी देवरकोंडा आणि भाऊ आनंद देवरकोंडाबरोबर दिसत आहे. हा फोटो X (पूर्वीचे ट्विटर) वर शेअर करण्यात आला आहे. या फोटोत रश्मिका स्वेटशर्ट आणि पँट अशा लूकमध्ये दिसत आहे. आणि तिचा स्वेटशर्ट विजय देवरकोंडाच्या कपड्यांच्या ब्रँडचा आहे. मात्र, विजय देवरकोंडा या फोटोत कुठेही दिसत नाही. या फोटोमुळे रश्मिका आणि विजयच्या नात्याबद्दल पुन्हा चर्चा सुरू झाल्या आहेत.

हेही वाचा…Pushpa 2: अल्लू अर्जुनशी एकदाही भेट नाही, तोंडात कापूस ठेऊन डबिंग अन्…; श्रेयस तळपदेने सांगितला अनुभव, म्हणाला…

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी पहिल्यांदा ‘गीता गोविंदम’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. हा चित्रपट दक्षिण भारतासह संपूर्ण देशात लोकप्रिय झाला. या दोघांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. या चित्रपटापासून ते दोघे एकमेकांना डेट करत आहेत असे बोलले जाते. या चित्रपटानंतर त्या दोघांनी ‘डिअर कॉम्रेड’ या चित्रपटात एकत्र काम केले होते.

पाहा फोटो –

हेही वाचा…Yo Yo Honey Singh Famous: हनी सिंगच्या आयुष्यावर आधारित असलेली डॉक्युमेंटरी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस; कधी, कुठे प्रदर्शित होणार? वाचा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रश्मिकाने ‘पुष्पा २: द रूल’ मध्ये श्रीवल्लीची भूमिका साकारली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला तिने ‘पुष्पा: द रूल’ च्या सेटवरील काही खास क्षण इन्स्टाग्रामवर शेअर केले. हे फोटो शेअर करत तिने अल्लू अर्जुन, दिग्दर्शक सुकुमार, चित्रपटाची टीम आणि चाहत्यांचे आभार मानले. अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असलेला ‘पुष्पा २: द रूल’ हा २०२१ मधील ब्लॉकबस्टर ‘पुष्पा: द राइझ’ चा सिक्वेल आहे. चित्रपट ५ डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने १७० कोटींची कमाई करत एसएस राजामौलींच्या ‘आरआरआर’ला मागे टाकले आहे.