scorecardresearch

“तो म्हणाला मी स्वतःच्या मुलीबरोबरही…” प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव

रतन राजपूतकडे एका वयस्कर निर्मात्याने शरीरसंबंधांची मागणी केली होती.

ratan raajputh video, ratan raajputh serials, ratan raajputh casting couch, ratan raajputh boyfriend, casting couch in bollywood, रतन राजपूत कास्टिंग काउच, रतन राजपूत, कास्टिंग काऊच
१४ वर्षांपूर्वी एका ६०-६५ वर्षांच्या निर्मात्याने तिच्याकडे शरीरसंबंधांची मागणी केली होती.

टीव्ही अभिनेत्री रतन राजपूत नेहमीच तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. कोरोना लॉकडाऊन दरम्यान, रतनने स्वतःचे यूट्यूब चॅनल सुरू केले होते, ज्यावर ती व्लॉगच्या स्वरूपात तिच्या आयुष्याशी संबंधित गोष्टी उघडपणे शेअर करते. रतनने त्याच्या अलीकडच्या एका व्लॉगमध्ये बॉलिवूडमध्ये होत असलेल्या कास्टिंग काउचबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. तिने सांगितले की, १४ वर्षांपूर्वी एका ६०-६५ वर्षांच्या निर्मात्याने तिच्याकडे शरीरसंबंधांची मागणी केली होती.

रतनने आपल्या व्लॉगमध्ये असेही सांगितले आहे की हा वयस्कर निर्माता इतका निर्लज्ज होता की त्याने त्याला सांगितले की जर संधी मिळाली तर तो स्वतःच्या मुलीबरोबरही शरीरसंबंध ठेवण्यास तयार असेल. रतन आपल्या व्लॉगमध्ये म्हणते, “आज १४ वर्षे झाली. मी त्यावेळी नवीनच मुंबईला आले होते. त्यावेळी एका ६०-६५ वर्षांच्या माणसाने माझा खूप अपमान केला होता. तो मला म्हणाला, तुझे केस पाहा, तुझी त्वचा पाहा, तू कसे कपडे घालतेस ते पाहा. तुला तुझा संपूर्ण लूक बदलावा लागेल. तुला पूर्ण मेकओव्हरची गरज आहे ज्यासाठी २ ते २.५ लाख रुपये खर्च येईल. पण मी पैसे का खर्च करू? जर मी पैसे खर्च करावे असं तुला वाटत असेल तर तू मला तुझा गॉडफादर बनव. तुला माझी मैत्रीण व्हावं लागेल.”

आणखी वाचा-आमिरसारखं दिसण्याच्या नादात पाकिस्तानी अभिनेता पोहोचला रुग्णालयात, वाचा नेमकं काय घडलं

रतन राजपूत म्हणाली, “हे सर्व ऐकून मी खूप घाबरले होते. अशा गोष्टी ऐकून मला धक्काच बसला. मी त्यांना म्हणाले की तुम्ही माझ्या वडिलांच्या वयाचे आहात आणि मी तुमची मैत्रीण कशी काय होऊ शकते? मी तुमचा आदर करते आणि तुम्ही सांगाल तसे करीन.” त्यानंतर त्या निर्मात्याला राग आला. तो रतनला म्हणाला, “मी तुझ्यासाठी फुकट काही करणार नाही, इथे फक्त मैत्री असते. अभिनयविश्वात यायचं असेल तर ही सगळी नाटकं करणं बंद कर आणि थोडी शहाणी हो.”

आपल्या व्लॉगमध्ये रतन राजपूतने आणखी एक धक्कादायक गोष्ट सांगितली. ती म्हणाला, “जेव्हा मी त्या माणसाला सांगितले की तो माझ्या वडिलांच्या वयाचा आहे, तेव्हा तो रागाने म्हणाला- ऐक, माझी मुलगीही अभिनेत्री झाली असती तर मीही तिच्याबरोबरही शरीरसंबंध ठेवले असते.’ रतन म्हणाली, “त्याचं बोलणं ऐकून मला धक्काच बसला. आपल्या मुलीबद्दल कोणी असं कसं म्हणू शकतं? आजही मला वाटतं की तो सापडला तर त्याच्या तोंडावर चप्पल फेकून मारावी.’

आणखी वाचा-लॉकडाउनमध्ये अभिनेत्री बनवते चुलीवर जेवण, पाहा व्हिडीओ

दरम्यान या व्लॉगमध्ये रतन राजपूतने सांगितले की, या घटनेनंतर तिने कोणत्याही चित्रपटासाठी प्रयत्न करणे बंद केले. ती म्हणाला, “मला खूप राग आला होता. तुम्हीच सांगा मी याला कास्टिंग काउच कसे म्हणू. आज जर कोणी माझ्याशी असं बोललं तर मी त्याच्या तोंडावर चप्पल फेकून मारेन.’ या व्लॉगमध्ये संघर्ष करणाऱ्यांना रतनने इंडस्ट्रीत कधीही तडजोड करू नये असा सल्लाही दिला.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-09-2022 at 12:54 IST

संबंधित बातम्या