सुप्रसिद्ध ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर विविध प्रकारच्या वेबसीरिज, चित्रपट प्रदर्शित होतात. सर्वाधिक गाजलेले कार्यक्रम देखील या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना पाहायला मिळतात. नेटफ्लिक्सद्वारे आजवर बऱ्याच नावाजलेल्या सीरिज प्रदर्शित करण्यात आल्या. आता सात वर्षांमध्ये पहिल्यांदाच नेटफ्लिक्सने आपल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बदल केले आहेत. तसेच नेटफ्लिक्सने आपल्या कर्मचाऱ्यांना देखील काही सूचना दिल्या आहेत.

स्वतः सहमत नसलेल्या कंटेंटवर देखील कर्मचाऱ्यांनी काम करावं आणि जर यावर काम करणं शक्य नसेल तर त्यांनी कंपनीमधून बाहेर पडावं असं नेटफ्लिक्सकडून त्यांच्या कर्मचाऱ्यांना सांगण्यात आलं आहे. नेटफ्लिक्सच्या आर्टिस्टिक एक्सप्रेशन या वेगळ्या सेक्शनमध्ये प्रेक्षकांसाठी असणाऱ्या ऑफर्सची माहिती देण्यात आली आहे. “आम्ही प्रेक्षकांनाच त्यांच्यासाठी काय योग्य आहे ते ठरवू देतो.” असं नेटफ्लिक्सने म्हटलं आहे.

आणखी वाचा – Photos : तेजस्विनी पंडितचे आजवरचे सगळ्यात हॉट लूक, मराठीमधील सर्वात बोल्ड सीरिजमध्येही करतेय काम

तसेच नेटफ्लिक्सने असेही नमूद केले आहे की, “कथांमध्ये आम्ही विविधता आणू इच्छितो. जरी आम्हाला काही शीर्षके आमच्या स्वतःच्या वैयक्तिक मूल्यांच्या विरूद्ध आढळली तरीही आम्ही ते काम करतो.” त्याचबरोबरीने नेटफ्लिक्स करत असलेल्या कामावर समर्थन करणं कर्मचाऱ्यांना कठीण वाटत असेल तर त्यांच्यासाठी नेटफ्लिक्स हे सर्वोत्तम ठिकाण असूच शकत नाही.” असं कंपनीचं म्हणणं आहे.

आणखी वाचा – पूजा हेगडेने का घातलं सलमान खानचं ब्रेसलेट? फोटो शेअर करत अभिनेत्री म्हणाली…

नेटफ्लिक्सने काही बदल करण्याआधी जवळपास १८ महिने कंपनीच्या कर्मचाऱ्यांबरोबर याबाबत चर्चा केली. आता नेटफ्लिक्स त्यांच्यासाठी चांगलं आहे की नाही हे कंपनीमध्ये काम करणारे कर्मचारीच योग्य तो निर्णय घेऊन ठरवू शकतात असं नेटफ्लिक्सचं म्हणणं आहे. तसेच नेटफ्लिक्स कंपनीशी संबंधित व्यक्तीने हे देखील सांगितलं की, “काही बदल करण्यापूर्वी कर्मचाऱ्यांकडून आम्ही याबाबत अभिप्राय मागितला होता. जवळपास १००० कर्मचाऱ्यांनी याबाबत आम्हाला काही बदल करण्याच्या सूचना दिल्या आणि ते बदल आम्ही केले.” नेटफ्लिक्स लाईव्ह स्ट्रिमिंग सुरु करण्याबाबत देखील आता विचार करत आहे.