टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत शुक्रवारी पहाटे दिल्लीहून रुरकीला जात असताना त्याची कार डिव्हायडरला धडकली, त्यानंतर कारला आग लागली. या अपघातात पंत थोडक्यात बचावला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पंतची प्रकृती धोक्याबाहेर आहे. काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंत यांच्यात सोशल मीडियावर भांडण झालं होतं, त्यानंतर या दोघांची बरीच चर्चा झाली होती. अशातच ऋषभच्या अपघातानंतर उर्वशीने अप्रत्यक्ष पोस्ट शेअर करत प्रार्थना करत असल्याचं म्हटलं होतं.

ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाल्यानंतर उर्वशी रौतेलाची पोस्ट, म्हणाली…

आता उर्वशी एअरपोर्टवर स्पॉट झाली आहे. यादरम्यान उर्वशी ब्लॅक बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिसली. अभिनेत्रीने न्यूड मेकअप, पोनीटेलमध्ये बांधलेले केस आणि ब्लॅक ग्लासेस तिने घातले होते. याबरोबरच त्यांनी टायगर प्रिंटची बॅग कॅरी केली होती. उर्वशी रौतेलाला विमानतळावर पाहून यूजर्सनी कमेंट करायला सुरुवात केली. एका चाहत्याने मॅम, तुम्ही ऋषभ पंतला पाहायला रुग्णालयात जाताय का? असा थेट प्रश्न उर्वशीला विचारला आहे.

उर्वशी रौतेलाचा हा एअरपोर्ट स्पॉटिंग व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. दरम्यान, आज अनिल कपूर आणि अनुपम खेर देखील ऋषभ पंतला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते. त्यांनी भेट घेतली आणि ऋषभची प्रकृती स्थिर असून सुधारणा होत आहे, अशी माहितीही त्यांनी दिली होती.

ऋषभ पंतचा मोठा खुलासा; म्हणाला, “झोप किंवा ओव्हरस्पीडिंग नाही तर अपघाताचं खरं कारण…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऋषभ पंतच्या हेल्थ प्रसिद्धीपत्रकात त्याच्या कपाळावर दोन खोल कट असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय त्याच्या उजव्या गुडघ्यातील अस्थिबंधन फाटले असून उजव्या हाताच्या मनगटाला आणि घोट्यालाही दुखापत झाली आहे. ऋषभ पंतवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय पथकाने टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले की, त्याच्या प्रकृतीवर ऑर्थोपेडिक्स विभागाचे डॉ. गौरव गुप्ता देखरेख करत आहेत. पंतची प्रकृती स्थिर असून त्याला कोणतीही जीवघेणी दुखापत झालेली नाही.