सध्या ब्रिटनमध्ये सत्तांतराचे वातावरण आहे. सोमवारी भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले. पंतप्रधानपदाच्या शर्यतीमध्ये पेनी मॉरडॉंट यांचा पराभव करत त्यांनी इतिहास रचला. नेतेपदी निवड होण्यासाठी आवश्यक असलेला किमान १०० खासदारांचा पाठिंबा मिळणे अशक्यप्राय असल्याचे लक्षात येताच मॉरडाँट यांनी माघार घेतली आणि हुजूर पक्षाचे नवे नेते म्हणून सुनक यांची बिनविरोध निवड झाली. यामुळे ते ब्रिटनमधले पहिले भारतीय वंशाचे पंतप्रधान बनले आहेत.

ऋषी सुनक यांचा हा विजय ब्रिटनसह भारतामध्येही साजरा केला जात आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांच्यापासून ते बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यापर्यंत सर्वांनी या ऐतिहासिक घटनेवर आपले मत मांडले आहे. नरेद्र मोदी यांनी ट्विट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी या ट्विटमध्ये “ऋषी सुनक पंतप्रधानपदी विराजमान झाल्याबद्दल तुमचे अभिनंदन. जागतिक स्तरावरील विषयांवर तुमच्याबरोबर काम करण्याची वाट पाहत आहे. २०३० पर्यंतची वाटचाल कशी असावी यासंदर्भातील योजना अंमलात आणण्याचा विचार आहे,” असे म्हटले आहे.

bsp mayavati
भाजप सत्तेत परतणे कठीण! मायावती यांच्या लोकसभा प्रचाराला सुरुवात
Orenthal James Simpson
स्पोर्ट्समन, सेलेब्रिटी… मग पत्नीची हत्या, निर्दोष मुक्तता तरी कफल्लक आयुष्य… ओ. जे. सिम्प्सन यांचे आजही अमेरिकेवर गारूड कसे?
IPL 2024 Royal Challengers Bangalore vs Kolkata Knight Riders Match Updates in Marathi
IPL 2024: केकेआरविरुद्ध ८३ धावांची खेळी करूनही विराट कोहली का होतोय ट्रोल? RCBचा पराभव चाहत्यांच्या जिव्हारी
Benjamin Basumatary sleeping on cash
नोटांच्या ढिगाऱ्यावर झोपलेल्या नेत्याचा फोटो व्हायरल; भाजपाच्या मित्रपक्षाने म्हटले…

आणखी वाचा – दिवाळीच्या दिवशीही जया बच्चन यांना संताप अनावर; नेटकरी म्हणाले, “मग संसदेतही…

दरम्यान ऋषी सुनक यांच्या विजयामुळे क्रिकेटपटू आशिष नेहराचे नाव वेगळ्याच कारणामुळे ट्वीटरवर ट्रेंड होत आहे. ऋषी सुनक आणि आशिष नेहरा या दोघांचा चेहरा काहीसा सारखा दिसतो. त्यांच्या चेहऱ्यामधील समानता असल्यामुळे त्या दोघांवरचे मीम्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. काहीजणांनी तर सुनक आणि अभिनेता जिम सरभ हे एकच आहेत असे मीम्स तयार केले आहेत. एका यूजरने गंमत म्हणून आशिष नेहराचा फोटो वापरुन ऋषी सुनक यांना पंतप्रधानपदी निवड झाल्याच्या शुभेच्छा देत फोटो पोस्ट केला. त्यावर दुसऱ्या यूजरने जिम सरभचा फोटो कमेंटमध्ये वापरुन त्यावर “नाही मित्रा. तो क्रिकेटपटू आशिष नेहरा आहे. मी खाली ज्यांचा फोटो लावला आहे ते ऋषी सुनक आहेत”, असे लिहिले आहे.

आणखी वाचा – आधी दिली प्रेमाची कबुली आता बॉयफ्रेंडसह दिवाळी साजरी करतेय वनिता खरात, फोटो व्हायरल

ब्रिटनमध्ये जन्मलेले ऋषी सुनक भारताचे जावई आहेत. २००९ मध्ये त्यांनी इन्फोसिस या आयटी कंपनीचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांच्या मुलीशी, अक्षताशी लग्न केले. नारायण मूर्तींनीही सुनक यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत.