अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जेनिलिया डिसुझा ही जोडी बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. सोशल मीडियावर ते दोघेही सक्रिय राहून त्यांच्या आयुष्याबद्दलचे अपडेट्स चाहत्यांना देत असतात. तसेच त्या दोघांचे रिल्सही तुफान व्हायरल होत असतात. नेहमी चर्चेत असलेल्या या कपलने पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष त्यांच्याकडे वळवलं आहे.

आणखी वाचा : कार्तिक आर्यनने नाकारली पान मसाल्याच्या जाहिरातीसाठी तब्बल ९ कोटींची ऑफर; नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव

याचे कारणही तितकेच खास आहे. या वर्षीचा गणेशोत्सव रितेश व जेनिलियासाठी खूपच खास ठरला. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर रितेश व जेनिलियाने नवी कोरी गाडी खरेदी केली आहे. त्यांच्या घरी BMW iX या इलेक्ट्रिक कारचे आगमन झाले आहे. हे दोघे अर्पिता खान व आयुष शर्माच्या घरी गणपती पूजेसाठी गेले असताना त्यांनू याच रॉयल कारमधून एन्ट्री केली.

रितेश व जेनिलिया भडक लाल रंगाच्या गाडीमधून आले आणि सर्वांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या. या गाडीची किंमत १.१६ कोटी रूपये इतकी आहे. तर मुंबईत या आलिशान कारची ऑनरोड किंमत सुमारे १.४३ कोटी आहे. रितेशला गाड्यांचे भरपूर वेड आहे. त्याच्याकडे अनेक लक्झरी गाड्यांचं कलेक्शन आहे. यात मर्सिडीज बेंजपासून रेंज रोव्हर अशा महागड्या गाड्यांचा समावेश आहे.

हेही वाचा : “रितेश रावांचं नाव घेते…”, जिनिलिया वहिनींचा मराठीत दमदार उखाणा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रितेश आणि जेनिलियाने ही नवी गाडी खरेदी केल्याचे कळल्यावर त्यांचे चाहते खूप खुश झालेले पहायला मिळत आहेत. त्यांच्यावर सोशल मीडियारून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. रितेश व जेनेनिया यांनी ३ फेब्रुवारी २०१२ रोजी त्यांनी लग्न केलं. दोघांना रियान आणि राहिल हे दोन मुलं आहेत.