अभिनेता रितेश देशमुखची पत्नी जिनिलिया देशमुख सध्या चित्रपटांपासून दूर आहे. पण सोशल मीडियाच्या माध्यमातून ती तिच्या चाहत्यांचं मनोरंजन करत असते. आपल्या मुलांबरोबर तसेच रितेशसह ती मजेशीर व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर करताना दिसते. आतादेखील असाच एक व्हिडीओ तिने सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल.

आणखी वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून ब्रेक घेत गौरव मोरे लंडनला रवाना, पोस्ट शेअर करत म्हणाला, “खूप भारी…”

जिनिलियाने एक रिल व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती संवाद बोलताना दिसत आहे. तसेच त्या व्यक्तीच्या संवादाबरोबर जिनिलिया आपल्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलताना दिसत आहे. जिनिलियाने हा व्हिडीओ शेअर करताच हजारो लोकांनी याला पसंती दर्शवली आहे.

पाहा व्हिडीओ

पहिलं प्रपोज आम्ही करायचं, सॉरी आम्ही बोलायचं, गिफ्ट आम्ही द्यायचं, ब्लॉकही आम्हालाच पहिलं केलं जातं मग लेडीज फर्स्ट का? लेडीज फर्स्ट हे नाटक कोणी सुरु केलं? या संवादांवर जिनिलिया चेहऱ्यावरील हावभाव बदलत आहे. तसेच व्हिडीओच्या शेवटी तिचा चेहऱ्यावरील क्युटनेस नेटकऱ्यांना अधिक आवडला आहे.

आणखी वाचा – Video : …अन् शोकसभेदरम्यान राजू श्रीवास्तव यांच्या पत्नी ढसाढसा रडल्या, म्हणाल्या, “आयुष्यच संपलं…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

३१हजारपेक्षा अधिक व्ह्युज तिच्या या व्हिडीओला मिळाले आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना तिने म्हटलं की, “पुरुषांसाठी विशेष सुचना. स्त्रियांच्या व्यक्तीमत्त्वावर नेहमीच प्रेम करा.” जिनिलियाच्या या मजेशीर व्हिडीओ पाहून तिच्या चाहत्यांनाही हसू अनावर झालं आहे.