बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. रितेश सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. रितेश आणि त्याच्या मुलांचे व्हिडीओ हे नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. नुकताच रितेशने त्याचा धाकटा मुलगा राहिलसोबत एक व्हिडीओ शेअर केला आहे.
रितेशने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत रितेशने राहिलला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. व्हिडीओत रितेश आणि राहिल बेडवर असल्याचे दिसत आहे. यावेळी बॅकग्राऊंडला तू मेरा जानू है तू मेरा दिलबर हे गाणं प्ले होताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा राहिल, तू खूप लवकर मोठा होतं आहेस…देवाचा तुझ्यावर आशीर्वाद असू दे”, असे कॅप्शन रितेशने दिले आहे. रितेश आणि राहिलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
आणखी वाचा : “…तर सनासना चार मुस्काडात ठिवून देईन”, किरण मानें यांच्या चाहत्यांनी व्यक्त केला संताप
आणखी वाचा : ‘या’ ३ राशींच्या लोकांवर असतो कुबेर देवाचा आशीर्वाद
रितेश आणि जिनेलियाने २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ९ वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर २०१२ मध्ये त्यांनी लग्न केले. यंदाच्या वर्षी त्यांच्या लग्नाला ९ वर्षे झाली आहेत. जिनेलियाला खरी लोकप्रियता ही २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटातून मिळाली. जिनेलियाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही काम केले आहे. मात्र, लग्नानंतर जिनेलियाने चित्रपटात काम केले नाही. त्यांना दोन मुलं असून मोठ्या मुलाचे नाव रियान आणि धाकट्याचे नाव राहिल आहे.