हॉलिवूड स्टार रॉबर्ट पॅटिनसनच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. हॉलिवूडचा बहुप्रतिक्षित सिनेमा ‘द बॅटमॅन’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर चाहत्यांकडून ट्रेलरला मोठी पसंती मिळताना दिसतेय. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक या सिनेमाच्या घोषणेची आतुरतेने वाट पाहत होते. करोना महामारीमुळे सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली जात होती. मात्र अखेर प्रेक्षकांची प्रतिक्षा संपील आहे.

४ मार्च २०२२ ला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी हा सिनेमा २०२१ सालामध्ये प्रदर्शित होणार होता मात्र करोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे सिनेमाचं शूटिंग थांबवण्यात आलं होतं. अखेर Warner Brosने या सिनेमाचा नवा ट्रेलर रिलीज करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिलीय. या ट्रेलरवरुनच सिनेमामध्ये अ‍ॅक्शनचा खजिना पाहायला मिळणार आहे हे लक्षात येतंय. तर रॉबर्ट पॅटिनसन त्याच्या दमदार अभिनयाने आणि अ‍ॅक्शनने प्रेक्षकांची पसंती मिळवण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज आहे.

‘या’ कारणासाठी कपिल शर्माला बंद करावा लागला होता शो, केला ‘त्या’ गोष्टीचा खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.


मॅट रीव्सने या सिनेमाची निर्मिती केली आहे. २१ जूनला हा सिनेमा रिलीज होणार होता. त्यानंतर ही तारीख बदलून १ ऑक्टोबर करण्यात आली होती. मात्र ऑक्टोबरमध्येही सिनेमाचं प्रदर्शन रद्द करण्यात आलं. अखेर ४ मार्च २०२२ला सिनेमा प्रदर्शित होणार आहे. दरम्यान या सिनेमाच्या ट्रेलरमुळे आता प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.