करण जोहर दिग्दर्शित बहुचर्चित आगामी चित्रपट ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’च शूटिंग सुरू झाले आहे. या चित्रपटात रणवीर सिंह आणि आलीया भट्ट प्रमुख भूमिका साकारताना दिसतील. जवळपास ५ वर्षाच्या मोठ्या ब्रेकनंतर करण जोहर या चित्रपटातून दिग्दर्शनात पुन्हा एकदा एन्ट्री करणार आहे. यापूर्वी त्याने २०१६ मध्ये रिलीज झालेल्या ‘ए दिल है मुश्किल’ चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. नुकतचं या चित्रपटाचा शूटिंग सुरू झालं असल्याचा व्हिडीओ करण जोहरने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.
शुक्रवारी करण आणि रणवीर सिंह यांनी सोशल मीडियावर चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले असल्याची घोषणा केली आहे. त्याने शेअर केलेल्या व्हिडीओत रणवीर आणि आलिया इतर कास्टशी ओळख करून देताना दिसत आहेत. याच बरोबर या चित्रपटातला त्या दोघांचा नवीन लूक देखील पाहायला मिळत आहे. रणवीरने टायगर प्रिंट असलेला शर्ट परिधान केला आहे. तर आलीयाने लाल रंगाची छान साडी नेसली असल्याचे या व्हिडीओत दिसून आले आहे. करण जोहरने हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शन दिलं आहे, “अखेर…तो दिवस आला आणि माझ्या मनात खूप भावना आहेत, मात्र सर्वात वरती आहे ती म्हणजे कृतज्ञता! आम्ही चित्रपटाचे पहिले वेळापत्रक सुरू केले असून आता फक्त तुमचा आशीर्वाद आणि प्रेमाची गरज आहे.
View this post on Instagram
रणवीरने सुद्धा हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, “तुमच्या आशीर्वाद आणि प्रेम आमच्यासोबत असू देत, कारण ‘रॉकी और रानी’ची आगळीवेगळी गोष्ट सुरू झाली आहे. “मागच्या महिन्यात रणवीरच्या वाढदिवसाच्या दिवशी करणने या चित्रपटाची घोषणा केली होती.
View this post on Instagram
‘रॉकी और रानी की प्रेम काहानी’ या चित्रपटात रणवीर आणि आलीयसोबत अभिनेता धरमेंदर, अभिनेत्री जया बच्चन आणि शबाना आजमी देखील महत्वाच्या भूमिका साकारताना दिसतील. धर्मेंद्र आणि जया बच्चन हे रणवीरचे आई-वडिलांची भूमिका साकारत होती. तर शबाना या आलीयाच्या आईची भूमिका साकरताना दिसतील. या व्हिडीओत त्याची एका वेगळ्या पद्धतीत ओळख करून दिली आहे. करणने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा पहिला लूक नेटकऱ्यांच्या पसंतीस पडला आहे. रणवीर आणि आलीया याधी ‘गली बॉय’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे. त्यामुळे आता त्याना पुन्हा एकत्र पाहण्यासाठी प्रक्षक प्रचंड उत्सुक आहेत.