‘आरआरआर’ चित्रपटाच्या सुपरहिट यशानंतर दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता राम चरणच्या लोकप्रियतेमध्ये आणखीनच वाढ झाली. आज त्याचे लाखो चाहते आहेत. सोशल मीडियावर सतत सक्रिय असणारा हा अभिनेता सध्या जंगल सफारी करत आहे. राम चरणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे यादरम्यानचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो ओपन जीपमध्ये जंगल सफारी करताना दिसत आहे. याचीच एक झलक आज आपण पाहणार आहोत.

आणखी वाचा – Video : …अन् मृणाल कुलकर्णी यांच्या लेकाने चक्क ताज हॉटेलमध्ये बायकोला दिलं वाढदिवसाचं सरप्राईज, व्हिडीओ व्हायरल

राम चरण सध्या कामामधून ब्रेक घेत सुट्ट्या एण्जॉय करताना दिसत आहे. पूर्व आफ्रिकेमधील तंजानिया जंगलामध्ये तो आपल्या पत्नीसह जंगल सफारी करत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. राम चरणने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो ओपन जीप स्वतः चालवताना दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

इतकंच नव्हे तर जंगल सफारीदरम्यान तो जीप मध्येच थांबवतो. तसेच जंगलामध्येच ऑम्लेट बनवण्याचा आनंद राम चरण घेत आहे. या व्हिडीओमधील राम चरणची हेअर स्टाइल तर विशेष लक्षवेधी आहे. जीप चालवण्याचा आनंद लुटल्यानंतर तो पुन्हा ड्रायव्हिंग सीटच्या मागे बसून फोटोग्राफी करत आहे.

आणखी वाचा – Video : “मी हिंदी भाषेमध्ये बोलू शकत नाही असं तुम्हाला वाटतं का?” पापाराझी छायाचित्रकारांना सनी लिओनीचा सवाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राम चरण काळ्या रंगाची कार्गो पँट, त्याच रंगाचं टीशर्ट व निळ्या रंगाच्या जॅकेटमध्ये अगदी उठून दिसत आहे. राम चरणच्या या व्हिडीओला लाखो चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे. त्याचबरोबरीने त्याच्या लूकचं चाहत्यांनी विशेष कौतुक केलं आहे.