scorecardresearch

‘Love You’, अखेर सई ताम्हणकरने प्रेमाची दिली कबुली, दौलतरावांच्या ‘त्या’ पोस्टवर केली कमेंट

सई ताम्हणकरचा आज ३६ वा वाढदिवस आहे.

sai tamhankar birthday anish joag,
सई ताम्हणकरचा आज ३६ वा वाढदिवस आहे.

मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. आज सईचा ३६ वा वाढदिवस आहे. आज तिच्या वाढदिवसानिमित्ताने चाहत्यांपासून सेलिब्रिटींनी तिला शुभेच्छा दिल्या. पण या सगळ्यात सर्वांचे लक्ष हे सईचा कथित बॉयफ्रेंड निर्माता अनिश जोगने शेअर केलेल्या पोस्टने वेधले आहे.

आणखी वाचा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक करत गौहर खान, म्हणाली…

अनिशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. अनिशने सईचे काही फोटो घेत एक व्हिडीओ बनवला आहे. हा व्हिडीओ शेअर करत “वाढदिवसाच्या शुभेच्छा मॅजिक! तू जग जिंकावे अशी माझी इच्छा आहे!”, असे कॅप्शन अनिशने दिले आहे. अनिशने शेअर केलेल्या या पोस्टवर सईने ‘लव्ह यू’ अशी कमेंट देखील केली आहे.

आणखी वाचा : “हॉस्पिटलमध्ये एकनाथ शिंदेंचा फोन आला, म्हणाले…”, शरद पोंक्षेंची पोस्ट चर्चेत

आणखी वाचा : वडील अभिषेकचा डान्स कसा वाटला? मनिष पॉलच्या प्रश्नावर आराध्याने दिले असे उत्तर

अनिश जोग आणि सई ताम्हणकर यांनी अनेक चित्रपट एकत्र केले आहेत. ‘गर्लफ्रेंड’, ‘धुरळा’, YZ, ‘टाइम प्लीज’ अशा अनेक चित्रपटांचा अनिश निर्माता आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sai tamhankar openly expressed his love for anish joag dcp

ताज्या बातम्या