क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीची पत्नी साक्षी धोनी एका दाक्षिणात्य अभिनेत्याची मोठा चाहती आहे. तिने नुकताच याबाबत खुलासा केला आहे. साक्षीने या अभिनेत्याचे हिंदीमध्ये डब केलेले चित्रपट पाहिले आहेत, असंही तिने सांगितलं. तिचा आवडता अभिनेता हा ‘पुष्पा’ फेम अल्लू अर्जुन आहे.

गरोदरपणात स्वप्न केलं पूर्ण; ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीने ‘या’ ठिकाणी घेतलं घर, पाहा व्हिडीओ

क्रिकेटर एमएस धोनी आणि त्याची पत्नी साक्षी धोनी आता चित्रपट व्यवसायात उतरण्याच्या तयारीत आहेत. धोनी एंटरटेन्मेंट या बॅनरखाली ते चित्रपट निर्मिती करणार आहेत. एका प्रमोशनल इव्हेंट दरम्यान, साक्षी धोनीने खुलासा केला की ती अल्लू अर्जुनची खूप मोठी चाहती आहे आणि तिने त्याचे हिंदीमध्ये डब केलेले सर्व चित्रपट पाहिले आहेत.

‘ओपनहायमर’मध्ये सेक्स करताना भगवद्गीतेचं वाचन, सीनचं ‘महाभारता’तील श्रीकृष्णाने केलं समर्थन; म्हणाले, “आजची परिस्थिती…”

पत्रकार परिषदेत साक्षीला विचारण्यात आले की तिने कोणताही तेलुगु चित्रपट पाहिला आहे का? यावर तिने उत्तर दिले, “मी अल्लू अर्जुनचे सर्व सिनेमे पाहिले आहेत. त्यावेळी नेटफ्लिक्स किंवा हॉटस्टार नव्हते. ते सर्व चित्रपट यूट्यूबवर व गोल्डमाइन प्रॉडक्शनवर होते. ते सर्व तेलुगु चित्रपट हिंदीत डब करून टाकत असायचे. मी मोठी होत असताना अल्लू अर्जुनचे सर्व सिनेमे पाहिले आणि मी त्याची खूप मोठी चाहती आहे.”

दरम्यान, ‘एलजीएम’ हा धोनी प्रोडक्शनचा पहिला तमिळ चित्रपट ३१ जुलैला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. अभिनेता हरीश कल्याण, नादिया आणि इवाना ‘एलजीएम’मध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.