scorecardresearch

सलमानच्या सेटवर अचानक पोहोचला शाहरुख, दोघांमधील वाढत्या मैत्रीचा व्हिडीओ पाहिलात का?

या व्हिडीओत त्या दोघांच्या घट्ट मैत्रीची झलक पाहायला मिळते.

shahrukh khan salman khan
शाहरुख खान, सलमान खान

बॉलिवूडचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा अभिनेता शाहरुख खानच्या बॉलिवूड कारकिर्दीला ३० वर्षं पूर्ण झाली आहेत. शाहरुख खान आणि सलमान खान यांची मैत्री आणि त्यांचे नाते नेहमीच चर्चेत असते. काही वर्षांपूर्वी झालेल्या मतभेदानंतर आता शाहरुख-सलमान पुन्हा एकत्र आले आहेत. त्यांचे विविध कार्यक्रमादरम्यान एकमेकांना मिठी मारतानाचे, एकत्र गप्पा मारत असल्याचे अनेक फोटो व्हिडीओ समोर येत असतात. नुकतंच सलमान-शाहरुखचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत त्या दोघांच्या घट्ट मैत्रीची झलक पाहायला मिळते.

या व्हिडीओत शाहरुख खान हा सलमान खान शूटींग करत असलेल्या चित्रपटाच्या सेटवर आल्याचे दिसत आहे. यावेळी सलमान खान शूटिंगमध्ये व्यस्त असताना अचानक सेटवर शाहरुख खान पोहोचतो. त्याला पाहून संपूर्ण टीम आश्चर्यचकित होते. यावेळी ते दोघेही एकमेकांना पाहून घट्ट मिठ्ठी मारतात. या व्हिडीओत अनुष्का शर्मा देखील दिसत आहे.

सलमान खानबद्दल शाहरुखचं मोठं वक्तव्य, म्हणाला “मला त्याच्यासोबत कोणताही…”

शाहरुख आणि सलमानचा हा व्हिडीओ फार जुना आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तो चित्रपटातील गाण्याचे शूटींग करत असल्याचे दिसत आहे. यात सलमान खान आणि शाहरुख खान या दोघांचे हावभाव फार चांगले आहेत. याद्वारे त्या दोघांमध्ये कमालीचे मैत्रीचे नाते असल्याचे दिसत आहे. सध्या त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेक नेटकरी त्यावर कमेंट करताना दिसत आहेत.

‘पठाण’मधील २० मिनिटांचा व्हिडीओ पाहून सलमान खानने केला शाहरुखला फोन, म्हणाला “तुझा हा चित्रपट…”

सलमान खानचा हा व्हिडीओ सुलतान या चित्रपटाच्या शूटींगदरम्यानचा आहे. सुलतान हा चित्रपट २०१६ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने दमदार कमाई केली होती. दरम्यान शाहरुख खान हा लवकरच ‘पठाण’या चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू या भाषेत प्रदर्शित होणार आहे. येत्या २५ जानेवारी २०२३ रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. तर सलमान खान हा ‘कभी ईद कभी दिवाली’, ‘टाइगर ३’, ‘गॉडफादर’, ‘किक २’, आणि ‘बजरंगी भाईजान २’, या चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Salman khan and shahrukh khan unseen video viral actors suddenly arrived on the sets of the film nrp