काही दिवसांपूर्वीच दाक्षिणात्य अभिनेता किच्चा सुदीप हिंदी भाषेवरून झालेल्या वादामुळे चर्चेत आला होता. हिंदी भाषेबाबत त्यानं केलेल्या वक्तव्यानंतर अभिनेता अजय देवगणनं त्याला ट्विटरवरून उत्तर दिलं होतं. आता किच्चा सुदीप त्याचा आगामी चित्रपट ‘विक्रांत रोना’मुळे चर्चेत आला आहे. बॉलिवूड विरूद्ध साउथ वादानंतर सलमान खान किच्चा सुदीपचा हा चित्रपट हिंदी भाषेत प्रदर्शित करणार आहे.

किच्चा सुदीपनं सलमान खानसोबत २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दबंग ३’मध्ये काम केलं होतं. मागच्याच महिन्यात सलमाननं किच्चा सुदीपच्या ‘विक्रांत रोना’चा हिंदी भाषेतील टीझर प्रदर्शित केला. आता त्यानं सोशल मीडियावरून हा चित्रपट हिंदी भाषेत प्रदर्शित करणार असल्याची घोषणा केली आहे. त्याने लिहिलं, ‘आतापर्यंत मी माझा ऑनस्क्रीन भाऊ किच्चा सुदीपचा अभिनय पाहून मंत्रमुग्ध झालो आहे. ‘विक्रांत रोना’चं हिंदी व्हर्जन तुमच्या सर्वांसाठी घेऊन येण्यासाठी मी आनंदी आहे. हा भारतीय चित्रपटसृष्टीत प्रेक्षकांसाठी सर्वात मोठा ३डी अनुभव असेल.’

आणखी वाचा- “पवार साहेबांच्या पायापर्यंत नाही आणलं ना तर…” केतकी चितळे प्रकरणावर सविता मालपेकर यांची संतप्त प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

किच्चा सुदीपचा ‘विक्रांत रोना’ चित्रपट 3D मध्ये भारतातील तब्बल ६ भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. मूळ कन्नड भाषेतील हा चित्रपट तमिळ, तेलुगू, मल्याळम, हिंदी आणि इंग्रजी भाषेत प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचं दिग्दर्शक अनुप भंडारी यांनी केलं आहे. या चित्रपटात किच्चा सुदीप व्यतिरिक्त जॅकलीन फर्नांडिस, निरूप भंडारी आणि नीता अशोक यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट २८ जुलै २०२२ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.