बॉलीवूड अभिनेता सलमान खान याच्या आगामी सुलतान या चित्रपटाचा पहिला टीझर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आला. त्यात कुस्तीपटूच्या भूमिकेत सलमानला आपण पाहिले. त्यानंतर आता या चित्रपटाचा दुसरा टीजर प्रदर्शित करण्यात आला असून यात अनुष्काचा धोबीपछाड लूक आपल्याला पाहायला मिळतो.
आपली ग्लॅमडॉलची ओळख पुसून अनुष्का आपल्याला एका नव्या रुपात पाहायला मिळते. या टीझरमध्ये अनुष्काची दोन रुपे पाहावयास मिळतात. घरात काम करणा-या सामान्य मुलीच्या भूमिकेत यात आपल्याला अनुष्का दिसतेच. पण त्याचसोबत आपल्या प्रतिस्पर्ध्याला आखाड्यात लोळवणा-या कुस्तीपटूची झलकही ती यात दाखवून जाते. अनुष्का या चित्रपटात आरफा या कुस्तीपटूची भूमिका साकारत आहे. या भूमिकेसाठी अनुष्काला कुस्तीचा धोबीपछाड हा डाव शिकण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागली होती.
अनुष्का शर्माने रविवारी तिचा २८ वा वाढदिवस साजरा केला. याच दिवशी अनुष्काच्या टिजरची पर्वणी प्रेक्षकांना मिळाली आहे.  ‘सुलतान’ हा चित्रपट ईदच्या मुहुर्तावर ६ जुलैला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan introduces his sultani arfa aka anushka sharma in the second teaser of sultan
First published on: 02-05-2016 at 09:33 IST