Salman Khan On His Bulletproof Balcony : सलमान खान हा बॉलीवूडचा सुपरस्टार आहे. त्याने आतापर्यंतच्या कारकिर्दीत अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत आणि प्रेक्षकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केले आहे. देश आणि जगभरातील चाहते त्याची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक असतात.

बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या आयुष्यात गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात अत्यंत भीतीदायक घटना घडली होती. मुंबईतील वांद्रे या ठिकाणी असणाऱ्या त्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर गोळीबार करण्यात आला होता.

बॉलीवूडचा भाईजान सलमान खानला अनेक वेळा जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत, त्यामुळे त्याची सुरक्षा पूर्णपणे कडक करण्यात आली आहे. सलमान खानच्या घराच्या बाल्कनीमध्ये बुलेट प्रूफ काच लावण्यात आल्या आहेत. आता सलमानने असे करण्यामागील खरे कारण उघड केले आहे.

दरवर्षीप्रमाणे, ईदच्या निमित्ताने सलमान त्याच्या कुटुंबासह बाल्कनीत आला आणि चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. फरक एवढाच होता की यावेळी समोर बुलेटप्रूफ काच होती. हे पाहून सर्वांना धक्का बसला. हे पाऊल का उचलण्यात आले असे विचारले असता, सलमानने TOI शी बोलताना सांगितले की, “हे कोणत्याही भीतीमुळे नाही. पूर्वी, अनेक वेळा काही चाहते बाल्कनीत चढून येथे झोपायचे, त्यामुळे ती जागा झाकून ठेवावी लागली.”

सलमानच्या घराबाहेर दरवर्षी हजारो चाहते जमतात हे सर्वांनाच माहिती आहे. त्याची एक झलक पाहण्यासाठी सर्वांनाच आतुरता असते. सलमान बाल्कनीत येतो आणि चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा देतो. पण यावर्षी सलमानने वेगळ्या पद्धतीने ईदी दिली. मुंबईतील त्याच्या घराबाहेर गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये गोळीबाराची घटना घडली होती. त्यानंतर त्याच्या घराभोवती सुरक्षा वाढवण्यात आली. तिथे बुलेट प्रूफ ग्लास बसवण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सलमान कोणत्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे?

सध्या सलमान त्याच्या ‘बॅटल ऑफ गलवान’ या नवीन चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. हा चित्रपट २०२० च्या गलवान व्हॅली संघर्षावर आधारित आहे, ज्यामध्ये कर्नल बिकुमल्ला संतोष बाबू शहीद झाले होते. सलमान या चित्रपटात एका लष्करी अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. चित्रपटाच्या तयारीबद्दल बोलताना तो म्हणाला की, या वयात अ‍ॅक्शन सीन्ससाठी प्रशिक्षण घेणे खूप कठीण होत आहे. सलमान या भूमिकेसाठी खूप मेहनत घेत आहे. हा चित्रपट २०२६ मध्ये प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे.