अभिनेता संजय दत्तच्या जीवनावर आधारित ‘संजू’ या बहुप्रतिक्षित चित्रपटातील आणखी एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. अमली पदार्थांच्या व्यसनातून मुक्त होण्यासाठीचा संजय दत्तचा संघर्ष या गाण्यातून पाहायला मिळत आहे. सुखविंदर सिंग आणि श्रेया घोषाल यांच्या आवाजातील या गाण्याचे बोल ‘कर हर मैदान फतेह..’ असे आहे.

दोन मिनिटांच्या या गाण्यात संजय दत्तचे बरेच रुप पाहायला मिळतात. ‘कर हर मैदान फतेह’ हे गाणं संजयच्या कुटुंबीयांच्या अवतीभोवती फिरतं. यामध्ये नर्गिसच्या भूमिकेतील मनिषा कोईरालाचीही झलक पाहायला मिळते. तर संजय दत्तच्या बहिणीची भूमिका अदिती गौतमने साकारली आहे. त्याचप्रमाणे तरुणपणापासून ते कारागृहातून सुटकेपर्यंतचा प्रवासही या दोन मिनिटांच्या गाण्यात साकारण्यात आला आहे. संजूच्या चांगल्या वाईट काळात खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या कुमार गौरव यांची भूमिका विकी कौशलनं साकारली आहे.

वाचा : ४५० कोटी बजेट असलेला अक्षयचा ‘हा’ चित्रपट अडचणीत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘संजू’ या चित्रपटात रणबीरसोबतच सोनम कपूर, दिया मिर्झा, परेश रावल, मनिषा कोईराला, विकी कौशल, अनुष्का शर्मा यांच्याही भूमिका आहेत. २९ जून रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संजय दत्तच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या प्रसंगावर या चित्रपटाच्या माध्यमातून प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. या चित्रपटातील तगडी स्टारकास्ट आणि ट्रेलर पाहून प्रेक्षकांमध्ये  उत्सुकता कमालीची वाढली आहे.