बॉलिवूड कलाकार हे कामयच त्यांच्या बॉडीगार्डसोबत असतात. त्यांचे बॉडीगार्ड्स देखील चर्चेत असतात. त्यामध्ये सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा असो किंवा शाहरुख खानचा बॉडीगार्ड रवि असो. सध्या सारा अली खानचा बॉडीगार्ड चर्चेत आहे. साराच्या बॉडीगार्डने असे काही केले की तिला फोटोग्राफरची माफी मागावी लागली आहे आणि तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

सोमवारी सारा तिचा आगामी चित्रपट ‘अतरंगी रे’मधील पहिले गाणे ‘चका चक’च्या लाँचसाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला पोहोचली होती. या गाण्यात साडी नेसून साराने जबदस्त डान्स केला आहे. गाणे लाँच दरम्यान सारा अली खान मजा मस्ती करताना दिसत होती. या कार्यक्रमात तिने डान्स देखील केला. पण जेव्हा कार्यक्रम संपला तेव्हा ती जाताना गाडीच्या इथे असलेल्या फोटोग्राफर्सशी बोलताना दिसते.
आणखी वाचा : हे तर तू तुझ्या मुलीसोबत रोमान्स केल्यासारखं, तू सैफसोबत…; ‘अतरंगी रे’मुळे अक्षय कुमार ट्रोल

‘कुठे आहे तो? जो धक्का लागून पडला’ असे सारा फोटोग्राफरला विचारते. त्यानंतर ती ‘ज्या व्यक्तीला धक्का लागला ती निघून गेली’ असे बोलताना दिसते. सारा तिच्या बॉडीगार्डला समजावत बोलते की, ‘तुम्ही कृपया कुणाला धक्का देऊ नका, कृपया असे करु नका.’ सारा तेथे उपस्थित असलेल्या सर्व फोटोग्राफरची माफी मागते.
आणखी वाचा : ‘एक लडकी को दो लडके मिल जाएंगे तो…’; ‘अतरंगी रे’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

साराचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी साराची वागणूक पाहून तिचे कौतुक केले आहे. अनेकांनी ‘सारा खूप चांगली आहे’ अशी कमेंट केली आहे. तर एका यूजरने ‘खूप छान’ असे म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘अतरंगी रे’ या चित्रपटात अक्षय कुमार, सारा अली खान आणि धनुष मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट २४ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल राय यांनी केले आहे. सुपरस्टार धनुषचा दिग्दर्शक आनंद एल रायसोबतचा दुसरा चित्रपट आहे. या दोघांनी यापूर्वी ‘रांझना’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, कलर येलो प्रॉडक्शन आणि केप ऑफ गुड फिल्म्स यांनी केली आहे. या चित्रपटाच्या चित्रिकरणाला २०२० मध्ये सुरुवात झाली होती.