‘कुली नंबर १’च्या सेटवर झालं होतं भांडण; साराची ‘ती’ कृती पाहून संतापले दिग्दर्शक

अन् सारा अली खानवर डेविड धवन संतापले….

सारा अली खान ही बॉलिवूडमधील सध्याची अघाडिची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ती ‘कुली नंबर १’ या चित्रपटाच्या माध्यमातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. नुकताच या आगामी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या चित्रपटासाठी तिने आपल्या अभिनयावर प्रचंड मेहनत घेतली होती. इतकच काय तर तिने दिग्दर्शक डेविड धवन यांचा राग देखील सहन केला होता.

अवश्य पाहा – शेतकरी आंदोलनाला बॉलिवूड गायिकेचा पाठिंबा; म्हणाली…

अलिकडेच आज तकला दिलेल्या मुलाखतीत साराने डेविड धवन यांच्यासोबत झालेल्या भांडणाचा किस्सा सांगितला. ती म्हणाली, “आम्ही मै रस्ते से जा राहा था या गाण्याचं चित्रीकरण करत होतो. त्यावेळी मेकअपमुळे मला सेटवर यायला थोडा उशीर झाला. पण यामुळे दिग्दर्शक माझ्यावर संतापले. खरं तर त्यावेळी मी शूटसाठी तयार होते पण कॉश्च्युम डिझायनरमुळे यायला मला थोडा उशीर झाला. त्यावेळी ते माझ्यावर संतापले होते. पण खरी गोष्ट कळताच त्यांनी माझी माफी देखील मागितली. डेविड सरांसारख्या मोठ्या दिग्दर्शकासोबत काम करणं माझ्यासाठी अविस्मरणीय अनुभव होता.”

 

View this post on Instagram

 

A post shared by VarunDhawan (@varundvn)

‘कुली नंबर १’ हा वर्षातील सर्वात मोठ्या बॉलिवूड चित्रपटांपैकी एक आहे. गेल्या वर्षीपासून या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. कुली नंबर १ हा चित्रपट १९९५ साली प्रदर्शित झालेल्या कुली नंबर १ चा रिमेक आहे. या चित्रपटात अभिनेता गोविंदा आणि आभिनेत्री करिश्मा कपूर यांनी मुख्य भूमिका साकारली होती. तर या नव्या रिमेकमध्ये वरुण धवन व सारा अली खान झळकणार आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sara ali khan david dhawan coolie no 1 mppg