बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची मुलगी सारा अली खान ही सतत चर्चेत असते. कधी तिच्या आगामी चित्रपटांमुळे तर कधी तिच्या खासगी आयुष्यामुळे. सारा ही तिच्या आई-वडिलांविषयी देखील अनेकदा बोलताना दिसते. सारा ही सध्या आई अमृतासोबत राहते. अमृता सिंह या देखील बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री होत्या. पण त्यांच्या एका चित्रपटातील सीनमुळे साराला लाज वाटली होती असे सारा म्हणाली होती.

अमृता सिंह यांनी अनेक बड्या कलाकारांसोबत काम केले आहे. तिने बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांच्या सोबत ‘मर्द’ या चित्रपटात काम केले आहे. हा चित्रपट १९८५ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. या चित्रपटातील अमृता आणि अमिताभ यांच्यामधील केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. पण जेव्हा हा चित्रपट अमृता मुलगी सारा अली खानने पाहिला तेव्हा तिला लाज वाटू लागली होती. याबाबत स्वत: साराने खुलासा केला होता.
आणखी वाचा : साराची सावत्र आई करीनासोबतची जवळीक पाहून अमृता सिंहला होतोय त्रास?

साराने एकदा करण जोहरच्या कॉफी विथ करण या शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी तिच्यासोबत सैफ अली खान देखील तेथे होता. दरम्यान, करण जोहरने साराला प्रश्न विचारला होता की, ‘तुझी आई अमृता सिंहचा कोणता चित्रपट आहे जो तुला अजिबात आवडत नाही?’ त्यावर उत्तर देत साराने ‘मर्द’ असे म्हटले. पुढे ती म्हणाली, ‘तो चित्रपटा होता ‘मर्द’. या चित्रपटामुळे अनेकदा लाजिरवाण्या परिस्थितीला समोरे जावे लागले होते.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या चित्रपटातील सीन विषयी बोलताना सारा म्हणाली, चित्रपटातील एका सीनमध्ये माझी आई आणि अमिताभ बच्चन यांना सुकलेल्या गवताच्या ढिगाऱ्यावर एकमेकांना किस करायचे होते. या सीनमुळे मला शाळेत प्रचंड चिडवले जात होते. त्यावर सैफ अली खान म्हणाला, ‘अमिताभ बच्चन यांना किस करण्यात काय चुकीचे आहे?’ त्यावर सारा लगेच म्हणाली, ‘ती माझी आई आहे. माझ्यासाठी हे खूप विचित्र होते.’