२००१ मध्ये करीना कपूर आणि शाहरुख खान अभिनीत ‘अशोका’ हा चित्रपट चर्चेत होता; पण तो बॉक्स ऑफिसवर काही खास कामगिरी करू शकला नाही. ‘अशोका’ चित्रपटातील ‘सन सनन’ हे गाणे त्या काळात खूप गाजले होते. या गाण्यातील करीना कपूरचा मेकअप आणि लूक लोकांना खूप आवडला होता.
खरं तर हा लूक सारा अली खाननेदेखील रिक्रिएट केला होता. सारा खूप लहान असताना, तिने ‘अशोक’मधील करीना कपूरसारखे कपडे घातले होते. काही वर्षांपूर्वी ‘बॉलीवूड हंगामा’बरोबरच्या संभाषणादरम्यान, अमृता सिंगची जवळची मैत्रीण व अभिनेत्री नवनीत निशान यांनी सांगितले की, अशोका या चित्रपटाच्या रिलीजनंतर सारा अली खानने एकदा बेबोसारखे दिसण्याची इच्छा व्यक्त केली होती. हे सैफ आणि करीनाच्या लग्नाच्या फक्त एक वर्ष आधी घडले होते आणि सारा त्यावेळी फक्त सहा वर्षांची होती.
नवनीत निशान म्हणाली, “मला आठवतंय जेव्हा ‘अशोका’ २००१ मध्ये प्रदर्शित झाला तेव्हा तिला करीना कपूरसारखे कपडे घालायचे होते. मी तिच्या अंगावर टॅटू काढले होते. मग मी तिला स्कार्फ बांधला. मला आठवतंय की, सैफ अली खान माझ्या घरी आला होता. त्याने तिच्याकडे आश्चर्याने पाहिले, ‘तू काय करतेयस?’ मी त्याच क्षणी एक फोटो क्लिक केला. त्या फोटोत अमृतादेखील आहे.”
२००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अशोका’मध्ये करीना खूपच सुंदर पेहरावात दिसली होती. २००१ मध्ये करीना कपूर खान आणि शाहरुख खान यांचा ‘अशोका’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात करीनाने मुख्य भूमिका साकारली होती. संतोष सिवान दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुख खानदेखील मुख्य भूमिकेत दिसला होता. त्या चित्रपटात करीनाचा कौरवाकीचा अभिनय सर्वांना आवडला. या चित्रपटातील ‘सन सनन’ हे गाणे त्या काळात खूप गाजले होते. आजही मुली त्या गाण्यातील करीनाचा लूक रिक्रिएट करतात.
‘केदारनाथ’, ‘लव्ह आज कल 2’, ‘सिम्बा’, ‘स्काय फोर्स’ यांसारख्या अनेक लोकप्रिय सिनेमांमध्ये आपल्या अभिनयानं चार चाँद लावणारी अभिनेत्री म्हणजे, सारा अली खान. ती आजच्या पिढीतील एक लोकप्रिय चेहरा आहे. तिच्या अभिनयाबरोबरच तिचा स्पष्टवक्तेपणा व साधेपणा यांमुळे ती नेहमीच चर्चेत असते. तिचा संबंध पतौडी घराण्याशी असला तरी तिने स्वतःच्या मेहनतीने बॉलीवूडमध्ये आपले स्थान निर्माण केलं आहे. सारा अली खानचं तिची सावत्र आई करीना कपूर खानबरोबरही घट्ट नातं आहे. दोघींमध्ये मैत्री आहे, जी अनेकदा चर्चेत असते.