‘ससुराल सिमर का’ फेम अभिनेत्री दीपिका कक्कर टीव्ही क्षेत्रातील सुप्रसिद्ध चेहरा आहे. नुकतंच ती ३५ वर्षाची झाली आहे. यंदाचा वाढदिवस तिने आपल्या कुटुंबीयांसोबत साजरा केलाय. कुटुंबीयांसोबत सेलिब्रेशनचे काही फोटोज तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना तिने पती शोएब इब्राहिमसोबत स्पेशल डे असल्याचं सांगितलं आहे.

‘ससुराल सिमर का’ मालिकेतील आदर्श सून म्हणून ‘सिमर’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री दीपिका कक्कर हिला अनेक जण छोट्या पडद्यावर अगदी साध्या, सालस रुपात पाहतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की दीपिका कक्कर खऱ्या आयुष्यात ही सिमर बहूसारखीच आहे. मग नातं टिकवायचं असो की आदर दाखवायचा असो दीपिका प्रत्येक क्षेत्रात परिपूर्ण आहे. मालिकेत सिमर बहू ज्याप्रमाणे संपूर्ण कुटूंबाची जबाबदारी सांभाळते, त्याचप्रमाणे दीपिका आपल्या खऱ्या जीवनात आणि वैयक्तिक आयुष्यातही समान संतुलन राखते. याचं उत्तम उदाहरण तिच्या वाढदिवशीच पहायला मिळालं.

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री दीपिका कक्कर हिचे सासरे म्हणजेच पती शोएब इब्राहिमच्या वडिलांना ब्रेन स्ट्रोकमुळे रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यामूळे त्यांच्या तब्बेतीसाठी अभिनेत्री दीपिका कक्करचे संपूर्ण कुटूंबच चिंतेत होतं. अशात तिचा वाढदिवस देखील आला होता. काल म्हणजेच ६ ऑगस्ट रोजी तिचा वाढदिवस होता. परंतू सासऱ्यांची प्रकृती स्थिरावत नाही तोपर्यंत तिने आपला वाढदिवस देखील साजरा केला नाही. अखेर आज तिच्या सासऱ्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं पाहून हा आनंद आणखी द्विगुणीत करण्यासाठी तिने आपला वाढदिवस आज कुटुंबीयांसोबत साजरा केलाय. याचे काही फोटोज शोएबने इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.

dipika-kakkar-shares-birthday-photos-instagram
(Photo : Instagram/shoaib2087)

पती शोएबने शेअर केली होती पोस्ट

आपल्या वडिलांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं पाहून शोएबने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली होती. “तुम्हा सर्वांचे आभार, बाबांसाठी प्रार्थना केल्याबद्दल आणि इतकं प्रेम दिल्याबद्दल… पप्पांवर आज शस्त्रक्रिया झाली आणि अल्हमदुलिल्ला ते आता ठीक आहेत. डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. इंशाअल्लाह, येत्या दोन दिवसात ते चालायला सुद्धा सुरुवात करतील. तुम्हा सर्वांनी केलेल्या प्रार्थनेबद्दल मनापासून धन्यवाद.” असं त्याने त्याच्या या पोस्टमध्ये लिहिलं होतं.

 

आणखी वाचा : शिल्पा शेट्टी ‘सुपर डान्सर’च्या सेटवर परतणार?; जॅकी श्रॉफ-संगीता बिजलानी सेलिब्रिटी पाहुणे बनून येणार

फॅन्सची फेवरेट जोडी आहे शोएब आणि दीपिका

शोएब आणि दीपिका हे कपल टीव्हीवरील सर्वात प्रसिद्ध आणि गोंडस जोडप्यांपैकी एक आहेत. दोघे सुरूवातीला ‘ससुराल सिमर का’ मालिकेच्या सेटवर भेटले आणि नंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. जवळपास पाच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 22 फेब्रुवारी 2018 रोजी शोएबच्या भोपाळच्या घरी त्यांचं लग्न झालं. लग्नात टीव्ही इंडस्ट्री आणि कुटुंबातील त्यांचे जवळचे मित्र देखील उपस्थित होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shoaib Ibrahim (@shoaib2087)

दीपिका कक्करच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर दीपिका कक्कर शेवटच्या वेळी ‘ससुराल सिमर का 2’ मध्ये छोट्या भूमिकेत दिसली होती. दुसरीकडे शोएबने ‘रेहना है तेरी पलकों की छाँ में’, ‘कोई लौट के आया है’ आणि ‘इश्क में मरजावां’ सारख्या लोकप्रिय शोमध्ये काम केलं आहे.