बॉलीवूडचा किंग शाहरुख खान पहिल्यांदाच ‘मेट गाला २०२५’मध्ये सहभागी झाला. ‘मेट गाला २०२५’मध्ये किंग खानने सब्यसाचीने डिजाइन केलेले आउटफिट घातले होते. काळ्या रंगाचा फ्लोअर लेंग्थ कोट घातला होता. ‘मेट गाला’ कार्पेटवर किंग खान त्याच्या आयकॉनिक पोजमध्ये दिसला आणि तो खूपच स्टायलिश दिसत होता.

शाहरुख खानने एका मुलाखतीत सांगितले की, त्याला खूप दडपण आलं होतं. , तो फक्त त्याची मुलं आर्यन आणि सुहानाच्या आनंदासाठी ‘मेट गाला’मध्ये सहभागी झाला होता.

“मला दडपण आलं होतं”
शाहरुख एका मुलाखतीत म्हणाला, “मला यापूर्वी कधीही इतकं दडपण आलं नाही. त्याने सांगितले की, तो खऱ्या आयुष्यात खूप लाजाळू आहे. त्याला सहसा टी-शर्ट आणि जीन्स घालायला आवडते. न्यू यॉर्कमध्ये मी ७२ तासांमधील २४ तास फक्त परफेक्ट जीन्स शोधण्यात घालवले.

मेट गालामध्ये शाहरुखने रचला इतिहास

शाहरुख ‘मेट गाला’ कार्पेटवर चालणारा पहिला भारतीय पुरुष अभिनेता ठरला. त्याचे डिझायनर सब्यसाची म्हणाले की, शाहरुखला खांद्यावरचे पॅड आवडत नाहीत. म्हणून असा सूट बनवला गेला, जो त्याच्यासाठी आरामदायी असेल. शाहरुख म्हणाला, “मी रेड कार्पेटवर फारसा जात नाही. मी लाजाळू आहे. हे माझ्यासाठी पहिल्यांदाच आहे.”

“मी मुलांमुळे आलो”

शाहरुख म्हणाला की, त्याने ‘मेट गाला’मध्ये जाण्याचा निर्णय घेतला. कारण- त्याची मुले त्यासाठी खूप उत्साही होती. त्याने सांगितले की, जेव्हा सब्यसाचीने त्याला फोन केला तेव्हा मुलांची प्रतिक्रिया होती – “वॉव!” पण शाहरुख अजूनही असा विचार करतो की, मुलांचा वॉव त्याला आमंत्रित केल्यामुळे होता किंवा तो तिथे चांगला दिसेल यासाठी होता”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘मेट गाला’मध्ये फॉरेन मीडिया शाहरुख खानला ओळखू शकला नाही. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये शाहरुख खान स्वतःची ओळख करून देताना दिसत आहे. या वर्षीची थीम “सुपरफाइन : टेलरिंग ब्लॅक स्टाईल” होती. शाहरुखसह कियारा अडवाणी आणि दिलजीत दोसांझ हेही या वर्षीच्या ‘मेट गाला’मध्ये पहिल्यांदाच सहभागी झाले होते.