Suhana Khan Wished Shah Rukh Khan : शाहरुख खानला त्याच्या ३३ वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. या आनंदाच्या प्रसंगी शाहरुख खानच्या मित्र आणि कुटुंबीयांनी त्याचे अभिनंदन केले.

मुलगी सुहाना खानने वडील शाहरुख खानसाठी एक सुंदर पोस्ट लिहिली. सुहानाने शाहरुख खानचा एक जुना फोटो शेअर केला आहे. त्या फोटोमध्ये सुहाना खान शाहरुखच्या कडेवर दिसत आहे.

सुहानाने तिच्या वडिलांसाठी लिहिली पोस्ट

सुहाना खानने एक ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर केला आहे. त्या फोटोमध्ये शाहरुख खानने त्याची मुलगी सुहानाला कडेवर घेतलं आहे. सुहानाने, झोपण्याच्या वेळेच्या कथांपासून छाप सोडणाऱ्या कथांपर्यंत, तुमच्यासारखे कोणीही सांगत नाही. अभिनंदन! मी तुमच्यावर खूप प्रेम करते, अशी कॅप्शन फोटोला दिली आहे.

गौरी खानची पोस्ट

पत्नी गौरी खाननेही शाहरुख खानला पहिल्यांदाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. गौरीने राणी मुखर्जी आणि करण जोहर यांचेही पुरस्काराबद्दल अभिनंदन केले. गौरीने इन्स्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले आहेत, पहिल्या फोटोमध्ये ती शाहरुख खान आणि राणी मुखर्जीबरोबर सेल्फी काढताना दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये करण जोहर आणि राणी मुखर्जी दिसत आहेत. गौरी खानने फोटोंना, ‘माझ्या तीन आवडत्या लोकांनी मोठा विजय मिळवला आणि आमची मनंही जिंकली. जेव्हा प्रतिभा चांगुलपणाला भेटते, तेव्हा जादू होते. खूप अभिमान आहे’, अशी कॅप्शन दिली आहे.

कोणत्या चित्रपटासाठी कोणाला पुरस्कार मिळाला?

शाहरुख खानला २०२३ च्या हिट चित्रपट ‘जवान’साठी ‘सर्वोत्तम अभिनेता’ श्रेणीत पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. त्याच वेळी राणी मुखर्जीला ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाला ‘सर्वोत्तम लोकप्रिय मनोरंजन चित्रपट’ श्रेणीत राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुहाना शाहरुखबरोबर ‘किंग’मध्ये दिसणार

शाहरुखच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तो सध्या त्याच्या आगामी ‘किंग’ चित्रपटावर काम करत आहे. या चित्रपटात शाहरुख खानबरोबर त्याची मुलगी सुहाना खानदेखील दिसणार आहे. शाहरुख आणि सुहानाव्यतिरिक्त, दीपिका पदुकोण, अभिषेक बच्चन, अर्शद वारसी, अभय वर्मा, जयदीप अहलावत, राघव जुयाल, राणी मुखर्जी व सौरभ शुक्ला हे कलाकारही ‘किंग’मध्ये दिसतील.