बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान गेल्या वर्षी ड्रग्स प्रकरणामुळे चर्चेत होता. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये एका क्रूझवर छापा टाकल्यानंतर ड्रग्ज प्रकरणात आर्यनला अटक करण्यात आली होती. मात्र, गेल्या महिन्यात एनसीबीने आरोपपत्र दाखल केले तेव्हा आर्यन खानला त्यात क्लीन चिट देण्यात आली होती. मात्र, त्या कठीण काळातही कुटुंबीयांनी मौन बाळगले होते आणि आताही त्यांना याबाबत काहीही बोलायचे नाही. या प्रकरणात एनसीबीच्या स्पेशल इन्वेस्टिगेशन टीमचे उपसंचालक संजय सिंह यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत शाहरुख खान आणि आर्यने काय सांगितले या विषयी सांगितले आहे.

आणखी वाचा : “तुम्ही माझी इज्जत धुळीस मिळवली, मला तुरुंगात…”; आर्यनने एनसीबी अधिकाऱ्याला केला होता सवाल

Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत
Hardik Malinga Pushing Video Viral
MI vs SRH : हार्दिक पंड्याने लसिथ मलिंगाला ढकलल्याने चाहते संतापले, VIDEO होतोय व्हायरल
Dog Shot By Police Officer Over 30 Times
धक्कादायक! पोलीस अधिकाऱ्याने कुत्र्यावर झाडल्या ३० पेक्षा जास्त गोळ्या, तरीही वाचला त्याचा जीव; काय आहे प्रकरण?
Thief snatches mangalsutra of woman when she was busy in making reels
धक्कादायक! भरदिवसा रस्त्यावर रिल करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र चोरट्यांनी नेले ओढून, Video व्हायरल

संजय यांनी नुकतीच इंडिया टुडेला मुलाखत दिली होती. यावेळी ते म्हणाले, आर्यन कोठडीत असताना शाहरुख खानने त्याची भेट घेतली होती आणि तो आपल्या मुलाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याबद्दल काळजीत होता. त्याने आर्यनला भेटण्याची आणि त्याच्यासोबत रात्र घालवण्याची परवानगीही मागितली होती, पण त्याला परवानगी मिळाली नाही. कोणत्याही पुराव्याशिवाय आपल्या मुलाची बदनामी केली जात असल्याचा आरोप शाहरुखने केल्याचे संजय सिंह यांनी सांगितले. संजयने असेही सांगितले की, एकदा संभाषणादरम्यान शाहरुखच्या डोळ्यात अश्रू आले होते आणि तो म्हणाला, ‘आम्हाला जगासमोर काही मोठ्या गुन्हेगार किंवा राक्षसांसारखे दाखवण्यात आले आहे, जो समाजाला नष्ट करण्यासाठी बाहेर पडला आहे.’

आणखी वाचा : अँबर हर्डची ११६ कोटीची नुकसान भरपाई जॉनी डेप करणार माफ, पण ‘या’ अटीवर; वकिलांनी केला खुलासा

आणखी वाचा : अँबर हर्ड विरोधात खटला जिंकवून देणाऱ्या वकिलासोबतच जॉनी डेप रिलेशनशिपमध्ये?

आर्यन खानला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने २ ऑक्टोबर रोजी मुंबईतील आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलमधून अटक केली होती. आर्यन खान मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझ शिपवर पार्टीत सहभागी होण्यासाठी जात असताना एनसीबीने छापा टाकला होता. त्यावेळी आर्यनला त्याच्या काही मित्रांसह त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणात तब्बल २६ दिवस सतत गोंधळ घातल्यानंतर अखेर २८ ऑक्टोबरला त्यांना जामीन मिळाली.