अ‍ॅमेझॉन ओरिजिनल मूव्ही ‘शेरशाह’ रिलीज झाल्यापासून प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी बरंच कौतुक केलं आणि सोबतच जगभरातील लोकांची मने जिंकत आहे. कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आणि युद्धावर आधारित असलेल्या या चित्रपटाने सुरुवातीच्या पंधरवड्यात यशाच्या शिखराला स्पर्श केला आहे. भारतात अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर सर्वाधिक पाहिला गेलेला चित्रपट म्हणून नवा विक्रम रचला आहे. याव्यतिरिक्त, पहिल्या दोन आठवड्यात ‘शेरशाह’ला 4100 हून अधिक भारतीय शहरांमधली प्रेक्षक लाभले आहेत.

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिलेली आहे. त्याच्या चित्रपटाला मिळालेलं यश पाहून सिद्धार्थ मल्होत्रा खूपच आनंदात आहे. त्याच्या ‘शेरशाह’ चित्रपटाला मिळत असलेला तुफान प्रतिसाद पाहून त्याने फॅन्सचे आभार देखील मानले आहेत. व्हिडीओसोबतच एक कॅप्शन लिहित त्याने फॅन्सचे आभार मानले. “तुमच्याकडून मिळत असलेल्या प्रेमासाठी खूप खूप आभारी आहे.” असं त्याने या कॅप्शनमध्ये लिहिलंय.

अभिनेश्री कियारा आडवाणीने सुद्धा तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट शेअर करत फॅन्सचे आभार मानले आहेत. “तुम्ही आमच्यावर करत असलेल्या प्रेमाच्या वर्षावासाठी, आदर आणि सहकार्यासाठी खूप खूप आभार.” असं लिहित तिने ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टसोबत तिने #शेरशाह असा हॅशटॅग देखील जोडलाय.

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवरील दुसरा कोणताही भारतीय चित्रपट जास्त शहरे आणि जगभरातील देशांमध्ये पाहिला गेला नाही. 8.9 च्या वापरकर्त्याच्या रेटिंगसह शेवटी 88,000 IMDb वापरकर्त्यांनी मतदान केलंय. शेरशाहने IMDb वर आतापर्यंतचा सर्वात लोकप्रिय हिंदी चित्रपट म्हणून एक नवीन बेंचमार्क सेट केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने त्याच्या इन्स्टाग्रामवर आणखी एक व्हिडीओ शेअर करत कारगिलमध्ये युद्धाचे सीन्स शूट करतानाचा अनुभव शेअर केला होता. यासोबत त्याने कॅप्शन देखील लिहिलीय. “कारगिल जिंकल्याचे सीन्स शूट करणे हा आम्हा सर्वांसाठी सर्वात रोमांचकारी आणि संस्मरणीय अनुभव आहे. खडकाळ प्रदेशांपासून दम लागण्यापर्यंत सगळ्या अडचणींचा सामना करत आम्ही शक्य तितकं वास्तविक ठेवण्याचा प्रयत्न केला. भारतीय सैन्याचे खूप खूप आभार. आणि आमच्या संचालक #विष्णुवर्धन, डीओपी, #कमलजीत नेगी, अॅक्शन डायरेक्टर्स @stevearoca1967, #SunilRodrigues आणि संपूर्ण क्रूला तुमच्या मेहनतीबद्दल. #शेरशाह #BehindTheScenes #MakingOfShershaah (sic). ”

‘शेरशाह’ चित्रपटात शिव पंडित, राज अर्जुन, प्रणय पचौरी, हिमांशू अशोक मल्होत्रा, निकितिन धीर, अनिल चरणजीत, साहिल वैद, शताफ फिगर आणि पवन चोप्रा यांच्याही भूमिका आहेत.